Join us  

कपिलदेव यांची ‘यो-यो’ विरोधात फटकेबाजी

‘खेळासाठी तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. परंतु, मैदानावरील कामगिरी त्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे मैदानावर चमकलेल्या; परंतु तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना डावलले जाऊ नये,’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 4:29 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘खेळासाठी तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. परंतु, मैदानावरील कामगिरी त्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे मैदानावर चमकलेल्या; परंतु तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना डावलले जाऊ नये,’ असे सांगत माजी कर्णधार कपिलदेव यांनी यो-यो चाचणीविरुद्ध जोरदार ‘बोलंदाजी’ केली.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) या निर्णयावर क्रिकेट वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ‘यो-यो’ चाचणीत अपयशी ठरणाऱ्या खेळाडूला राष्ट्रीय संघात निवडले जाणार नाही, असे सांगितले होते. मात्र, माजीे कर्णधार कपिलदेव यांनी ‘ही चाचणी अनिवार्य नसावी,’ असे मत त्यांनी मांडले आहे.कपिलदेव म्हणाले की, ‘मैदानावरील कामगिरी अधिक महत्त्वाची आहे. आर. अश्विन हा १०० टक्के तंदुरुस्त खेळाडू नाही, परंतु त्याची कामगिरी शंभर टक्के आहे. त्याचे विक्रम मोडणे शक्य नाहीत. त्यामुळे ‘यो-यो’ उत्तीर्ण न केल्यास त्याला डावलणे योग्य आहे का?’

टॅग्स :कपिल देव