Join us  

भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे क्रिकेटवीर कपिल देव झाले 'कुलगुरू'

कपिल देव यांच्यावर मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 6:54 PM

Open in App

चंदिगड : भारताला 1983 साली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकूण देणारे कर्णधार कपिल देव यांची हरयाणा स्पोर्ट्स विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे. हरयाणा युवा व क्रीडा मंत्री अनिल वीज यांनी ट्विट करून ही माहिती दिली. हे देशातील तिसरे क्रीडा विद्यापीठ आहे. या विद्यापीठांमध्ये गुजरात गांधीनगर येथील स्वर्निम गुजरात क्रीडा विद्यापीठ आणि चेन्नईच्या तामीळनाडू फिजिक्स एज्युकेशन व क्रीडा विद्यापीठाचा समावेश आहे. पण, पुर्णतः खेळासाठी असलेले हे पहिलेच विद्यापीठ आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक करीअरच्या अनेक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये हरयाणा क्रीडा विद्यापीठाचे बील पास करण्यात आले.  

''या विद्यापीठाला राष्ट्रपतींची अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे, परंतु त्यासाठीचे सर्व पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कपिल देव यांची नियुक्ती करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. याबाबत मी व्यक्तीशः कपिल देव यांच्याशी बोललो आहे आणि त्यांनीही होकार कळवला आहे,''असे अनिल वीज यांनी सांगितले. 

कपिल देव यांनी 1975 साली हरयाणाकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सहा विकेट घेत हरयाणाला विजय मिळवून दिला होता. 

टॅग्स :कपिल देवहरयाणा