न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! अखेर kane williamson चा मोठा निर्णय, कर्णधारपदही सोडले

न्यूझीलंडच्या संघासाठी यंदाचा ट्वेंटी-२० विश्वचषक म्हणजे एक वाईट स्वप्नच.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 08:17 AM2024-06-19T08:17:09+5:302024-06-19T08:38:17+5:30

whatsapp join usJoin us
Kane Williamson declines central contract and leaves white-ball captaincy of New Zealand, read here details  | न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! अखेर kane williamson चा मोठा निर्णय, कर्णधारपदही सोडले

न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! अखेर kane williamson चा मोठा निर्णय, कर्णधारपदही सोडले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Kane Williamson News : केन विल्यमसनच्या नेतृत्वातील न्यूझीलंडच्या संघासाठी यंदाचा ट्वेंटी-२० विश्वचषक म्हणजे एक वाईट स्वप्नच. किवी संघाला यंदा अफगाणिस्तानने पराभवाची धूळ चारून मोठा उलटफेर केला. त्यामुळे त्यांना सुपर-८ मध्ये स्थान मिळवता आले नाही. साखळी फेरीतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये न्यूझीलंडला अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने पराभूत केले. विशेष बाब म्हणजे ट्वेंटी-२० विश्वचषकात प्रथमच किवी संघाला केवळ साखळी फेरीपर्यंत समाधान मानावे लागले आहे. आता संघाच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार केन विल्यमसनने मोठा निर्णय घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याने कसोटी क्रिकेटसह परदेशी फ्रँचायझी लीगमध्ये खेळता याने यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 

याशिवाय केन विल्यमसनने आता मर्यादीत षटकांच्या अर्थात वन डे आणि ट्वेंटी-२० संघाचे देखील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा राष्ट्रीय संघ आणि देशांतर्गत सुपर स्मॅशच्या सामन्यांसाठी किवी संघाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅकचा हिस्सा असलेले खेळाडू उपलब्ध असणे आवश्यक आहे. हा मोठा निर्णय घेताना विल्यमसन म्हणाला की, आमचा संघ क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये प्रगती करत आहे याचा मला आनंद आहे. मी भविष्यात देखील माझे योगदान देत राहीन. मी सेंट्रल कॉन्ट्रॅक स्वीकारण्यास असमर्थ आहे. न्यूझीलंडसाठी खेळणे म्हणजे एक अभिमानाची बाब आहे. मात्र, क्रिकेटपलीकडे देखील माझे जीवन आहे आणि मला माझ्या कुटुंबीयांसोबत अधिक वेळ घालवायचा आहे. 

विल्यमसनने कर्णधारपद सोडले
दरम्यान, यापूर्वीच विल्यमसनने न्यूझीलंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. अशातच आता त्याने वन डे आणि ट्वेंटी-२० संघाची धुरा देखील इतरांवर सोपवली आहे. विल्यमसनने ९१ वन डे आणि ७५ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये किवी संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. यादम्यान न्यूझीलंडला ४७ वन डे आणि ३९ ट्वेंटी-२० सामने जिंकण्यात यश आले. केन विल्यमसनशिवाय न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने देखील स्वत:ला सेंट्रल कॉन्ट्रॅकमधून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: Kane Williamson declines central contract and leaves white-ball captaincy of New Zealand, read here details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.