Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ranji Trophy : KL राहुलची क्लास सेंच्युरी! मुंबईला पराभवाचा धक्का; कर्नाटकची सेमीफायनलमध्ये धडक

केएल राहुलची कमबॅक इनिंग! यशस्वी जैस्वाल दोन्ही डावात अपयशी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:20 IST

Open in App

K L Rahul’s Century Karnataka Into Ranji Trophy Semifinal :  रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकने ४२ वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई संघाला चार विकेट्सनी पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मुंबईतील एमसीए–बीकेसी मैदानावर झालेल्या सामन्यात केएल राहुल कर्नाटक संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. दबावात त्याने आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवत शतकी खेळीसह संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यंदाच्या रणजी हंगामातील उपांत्य फेरीत कर्नाटकचा संघ आता उत्तराखंडविरुद्ध खेळताना दिसेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

KL राहुलची क्लास खेळी

 

मुंबईच्या संघाने कर्नाटकसमोर विजयासाठी ३२५ धावांचं आव्हानात्मक टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना लोकेश राहुलनं  १८२ चेंडूत १३० धावांची शानदार खेळी साकारली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे हे २४ वे आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ९ वे शतक आहे.

"जल्दी खा लियो…" अभिषेक शर्मानं सर्वांत आधी सोडलं कोच गंभीरचं घर! डिनर पार्टीतील 'तो' व्हिडिओ व्हायरल

राहुल–स्मरणची निर्णायक भागीदारी

लोकेश राहुल आणि स्मरण रविचंद्रन या जोडीच्या भागीदारीनं मुंबईचं गणित चुकलं. स्मरणने जबाबदारीनं खेळताना नाबाद ८३ धावांची खेळी केली. या दोघांनी केलेल्या १४७ धावांच्या भागीदारीच्या जोरावर हा सामना कर्नाटकच्या बाजूनं झुकला. लोकेश राहुलनं विकेट गमावल्यावर स्मरण रविचंद्रन याने शेवटपर्यंत मैदानात थांबून संघाचा विजय निश्चित केला.

पहिल्या डावातील अपयशानंतर दमदार कमबॅक

या सामन्याच्या पहिल्या डावात केएल राहुल लौकिला साजेसा खेळ करू शकला नव्हता. पहिल्या डावात त्याने २८ धावांची खेळी केली. त्याच्या  फ्लॉप शोनंतरही कर्नाटकच्या संघाने  पहिल्या डावात ५३ धावांची महत्त्वाची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात मात्र राहुलने अनुभवाचा पुरेपूर वापर करत क्लास दाखवला. शतक पूर्ण केल्यानंतरही त्याने कोणताही मोठा जल्लोष न करता संघाच्या विजयावरच लक्ष केंद्रित ठेवलं.

कधी आणि कुठं रंगणार उपांत्य फेरीचा सामना?

या विजयासह कर्नाटक संघाने उपांत्य फेरीचं तिकीट निश्चित केलं आहे. आता १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान बंगळुरूच्या मैदानात उत्तराखंडविरुद्ध कर्नाटक यांच्यात अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी लढत रंगेल. मुंबईसारख्या तगड्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत  केल्यावर कर्नाटक संघ या स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

यशस्वी जैस्वाल दोन्ही डावात अपयशी   

एका बाजूला टीम इंडियाच्या कसोटी संघातील लोकेश राहुलच्या रुपात एक ओपनर हिट ठरला. दुसऱ्या बाजूला मुंबई संघाच्या डावाची सुरुवात करणारा  यशस्वी जैस्वाल सपशेल अपयशी ठरला. यशस्वी जैस्वाल याने पहिल्या डावात १२ चेंडूत ५ धावा केल्या. दुसऱ्या डावत तो फक्त ३६ धावा करून बाद झाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : KL Rahul's Century Propels Karnataka to Ranji Trophy Semifinal Victory!

Web Summary : KL Rahul's brilliant century led Karnataka to a Ranji Trophy semifinal berth, defeating Mumbai by four wickets. Rahul's 130-run knock and Ravichandran's unbeaten 83 secured the win. Karnataka will now face Uttarakhand in the semifinal.
टॅग्स :रणजी करंडकलोकेश राहुलयशस्वी जैस्वाल