Video: विराटनं काढला दाढीचा इन्शुरन्स?

के. एल. राहुलनं ट्विट केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 17:27 IST2018-06-08T17:27:19+5:302018-06-08T17:27:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
K L Rahul tweets leaked footage of Virat Kohli getting his beard insured | Video: विराटनं काढला दाढीचा इन्शुरन्स?

Video: विराटनं काढला दाढीचा इन्शुरन्स?

मुंबई: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली कायमच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतो. कोहली त्याच्या फिटनेस आणि लूकला नेहमीच जपतो. कोहलीची दाढी तर तरुणाईत ट्रेंडमध्ये आहे. कोहलीच्या हँडसम लूकमध्ये त्याच्या दाढीचा मोठा वाटा आहे. हे सर्व असताना कोहलीनं त्याच्या दाढीचा विमा काढल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ क्रिकेटपटू के. एल. राहुलनं पोस्ट केला आहे. 

विराट कोहली नेहमीच त्याच्या दाढीची काळजी घेताना दिसतो. त्यामुळेच त्यानं दाढीचा विमा काढल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात आहे. के. एल. राहुलनं ट्विटरवर एक सीसीटीव्ही फुटेज पोस्ट केल्यावर या चर्चेला सुरुवात झाली. यामध्ये विराट कोहली एका सोफ्यावर बसला असून दोघेजण त्याच्या दाढीचे फोटो काढताना दिसत आहेत. या दोघांपैकी एकानं कोहलीच्या दाढीचे केसदेखील एका पिशवीत जमा केले आहेत. 'विराट, तू तुझ्या दाढीला खूप जपतोस हे आम्हाला माहित आहे. आता तू दाढीचा विमा काढल्यानं ते सिद्धही झालं आहे,' असं राहुलनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 





राहुलनं ट्विट केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेजण विराट कोहलीच्या दाढीचं माप घेताना, तिचे फोटो काढताना दिसत आहेत. यानंतर हे दोघे विराटला काही कागदपत्रं देतात आणि त्यावर त्याची स्वाक्षरीदेखील घेतात. के. एल राहुलच्या ट्विट केलेल्या या व्हिडीओवर अद्याप कोहलीनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र हा सर्व प्रकार लंडनमधील मादाम तुसाँ संग्रहालयात कोहलीचा मेण्याचा पुतळा उभारण्यासाठी करण्यात आल्याची सर्वाधिक शक्यता आहे. 

Web Title: K L Rahul tweets leaked footage of Virat Kohli getting his beard insured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.