Breaking: आयपीएल 2020 संदर्भात BCCIची महत्त्वाची घोषणा

कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन 21 दिवसांनी वाढवण्याची घोषणा मंगळवारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 04:40 PM2020-04-16T16:40:33+5:302020-04-16T16:55:34+5:30

whatsapp join usJoin us
JUST IN: BCCI officially suspends IPL 2020 indefinitely in light of the Corona virus pandemic svg | Breaking: आयपीएल 2020 संदर्भात BCCIची महत्त्वाची घोषणा

Breaking: आयपीएल 2020 संदर्भात BCCIची महत्त्वाची घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन 21 दिवसांनी वाढवण्याची घोषणा मंगळवारी केली. त्यानुसार 3 मे पर्यंत हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे अखेरीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) गुरुवारी आयपीएल 2020च्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेतला.

29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता लॉकडाऊन वाढला आणि आयपीएलवरील अनिश्चितता अधिक वाढली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गुरुवारी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की,''कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारन लॉकडाऊन केलं आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलनं आयपीएल 2020 चे सत्र पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.''

''देशातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा हे महत्त्वाचे आहे. बीसीसीआय, फ्रँचायझी मालक, ब्रॉडकास्टर, स्पॉन्सर्स आणि सर्व भागदारक यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला गेला आहे. देशातील परिस्थितीवर बीसीसीआय लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन यांच्याकडून आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेत आहोत,'' असेही शाह यांनी सांगितले.  


 

आयपीएल 2020साठी बीसीसीआयनं अनेक पर्यायांचा विचार केला होता. त्यांनी ही स्पर्धा बंद स्टेडियमवर खेळवण्याचाची पर्यायाचा विचार केला. आता आयपीएलसाठी सप्टेबंर आणि नोव्हेंबरची विंडो खुली आहे. पण, ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्याचा निर्णय झाला तर.  

Web Title: JUST IN: BCCI officially suspends IPL 2020 indefinitely in light of the Corona virus pandemic svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.