Join us  

ज्युनियर्सची विजयाने सुरुवात, सलामी लढतीत आॅस्ट्रेलियावर १०० धावांनी मात

भारतीय संघाने रविवारी शानदार फलंदाजीनंतर अचूक मारा करीत आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध १०० धावांनी दिमाखदार विजय मिळवला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 6:07 AM

Open in App

माऊंट मौंगानुई : भारतीय संघाने रविवारी शानदार फलंदाजीनंतर अचूक मारा करीत आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध १०० धावांनी दिमाखदार विजय मिळवला. कर्णधार पृथ्वी शॉची ९४ धावांची खेळी आणि सहकारी मनज्योत कालरासोबत (८६) सलामीला केलेल्या १८० धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने ७ बाद ३२८ धावांची दमदार मजल मारली.शॉ व कालरा बाद झाल्यानंतरही आॅस्ट्रेलियन गोलंदाजांना सुटकेचा श्वास घेता आला नाही. कारण शुभमान गिलने गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना ६३ धावांची खेळी केली. अभिषेक शर्माने ८ चेंडूंमध्ये २३ धावांची खेळी केल्यामुळे भारताने ३०० चा पल्ला ओलांडला. त्याने दोन षटकार व दोन चौकार लगावले.प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलियाचा डाव ४२.५ षटकांत २२८ धावांत संपुष्टात आला. आॅस्ट्रेलियातर्फे सलामीवीर जॅक एडवर्ड््सने सर्वाधिक ७३ धावा केल्या. भारताची लढत आता मंगळवारी पापुआ न्यू गिनी संघासोबत होणार आहे.नागरकोटीने केला १५० किमी प्रती तास वेगवान माराभारताचा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी (३-२९) आणि शिवम मावी (३-४५) यांनी आपल्या वेगवान माºयाने प्रभावित केले. या दोघांनी सहा बळी घेतले. नागरकोटीने सातत्याने १५० किलोमीटर प्रति तास वेगाने मारा केला आणि मावीने त्याला पूर्ण सहकार्य केले. त्याने १४५ किलोमीटर प्रती तास वेगाने गोलंदाजी केली. दोन्ही वेगवान गोलंदाजांनी आॅफ स्टंप लाईनने मारा करीत आॅस्ट्रेलियन फलंदाजांची चाचणी घेतली. (वृत्तसंस्था)धावफलकभारत : शॉ झे. होल्ट गो. सदरलँड ९४, कालरा झे. संघा गो. उप्पल ८६, गिल झे. व गो. एडवर्ड््स ६३, राणा झे. व गो. एडवर्ड््स १४, रॉय झे. संघा गो. वॉ ०६, शर्मा झे. सदरलँड गो. एडवर्ड््स २३, नागरकोटी नाबाद ११, सिंग झे. एडवर्ड््स १०, जुयाल नाबाद ०८. अवांतर (१३). एकूण ५० षटकांत ७ बाद ३२८. बाद क्रम : १-१८०, २-२००, ३-२४९, ४-२७२, ५-२८२, ६-२९८, ७-३२०. गोलंदाजी : बार्टलेट ७-१-४७-०, राल्सटोन ५-०-२६-०, सदरलँड १०-०-५५-१, एडवर्ड््स ९-०-६५-४, पोप ३-०-२२-०, मर्लो २-०-१३-०, उप्पल ८-०-३५-१, वॉ ६-०-६४-१.आॅस्ट्रेलिया :- एडवर्ड््स त्रि. गो. रॉय ७३, ब्रायंट झे. मावी गो. नागरकोटी २९, संघा झे. शॉ गो. शर्मा १४, मर्लो त्रि. गो. मावी ३८, उप्पल धावबाद ०४, वॉ झे. जुयाल गो. नागरकोटी ०६, सदरलँड त्रि. गो. नागरकोटी १०, होल्ट पायचित गो. मावी ३९, बर्टलेट झे. जुयाल गो. मावी ०७, राल्सटोन धावबाद ०३, पोप नाबाद ००. अवांतर (५). एकूण ४२.५ षटकांत सर्वबाद २२८. बाद क्रम : १-५७, २-८६, ३-१४५, ४-१५७, ५-१६६, ६-१६८, ७-१८७, ८-२०५, ९-२२८, १०-२२८. गोलंदाजी : मावी ८.५-१-४५-३, पोरेल ४.१-०-२४-०, सिंग ६.५-०-३०-०, नागरकोटी ७-१-२९-३, शर्मा ७-०-३३-१, राणा ४-०-३०-०, रॉय ५-०-३६-१.

टॅग्स :क्रिकेटभारतआॅस्ट्रेलिया