RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं

IPL 2025 Qualifier 1: आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यात खेळला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:37 IST2025-05-29T20:36:54+5:302025-05-29T20:37:52+5:30

whatsapp join usJoin us
Josh Hazlewood Returns For RCB As Nuwan Thushara Misses Out | RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं

RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचा समावेश करून पंजाबचे टेन्शन वाढवले.

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर रजत पाटीदार म्हणाला की, या सामन्यात आमच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. नुवान तुषाराच्या जागी जोश हेझलवूडला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले, असे त्याने सांगितले. जोश हेझलवूड उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि तो चांगली कामगिरी देखील करत आहे.

जोश हेझलवूडने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान आयपीएल यंदाचा हंगाम पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर जोश हेजलवूड मायदेशी परतला. मात्र, आता तो पुन्हा संघात परतला आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जोश हेजलवूडने सर्वाधिक १८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या पुनरागमनामुळे आरसीबीला बळकटी मिळाली आहे. हेझलवूडकडे अचूक लाईन-लेंथ आणि यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे. 

आरसीबीचा संघ:
विराट कोहली, फिल साल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड, सुयश शर्मा.
इतर: मयंक अग्रवाल, रसिक सलाम, मनोज भंडागे, टिम सेफर्ट, स्वप्नील सिंग.

Web Title: Josh Hazlewood Returns For RCB As Nuwan Thushara Misses Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.