Join us  

सचिनचे पदस्पर्श करण्याचा जॉन्टी ऱ्होड्सकडून प्रयत्न, नेमकं काय घडलं? पाहा... 

पंजाबने मुंबईला पराभूत केल्यानंतर उभय संघातील खेळाडू आणि स्टाफ एकमेकांना भेटत असताना पंजाब संघाशी जुळलेला द. आफ्रिकेचा माजी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्स याने मुंबई इंडियन्सचा मेंटर सचिन तेंडुलकरला पदस्पर्श केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 7:49 AM

Open in App

पुणे :  

पंजाबने मुंबईला पराभूत केल्यानंतर उभय संघातील खेळाडू आणि स्टाफ एकमेकांना भेटत असताना पंजाब संघाशी जुळलेला द. आफ्रिकेचा माजी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्स याने मुंबई इंडियन्सचा मेंटर सचिन तेंडुलकरला पदस्पर्श केला. सचिनने लगेचच खाली वाकून जॉन्टीचे हात पकडले आणि त्याला पाया पडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटचे हेच सौंदर्य आहे. जाॅन्टी ५२ तर सचिन ४८ वर्षांचा आहे. आपल्या संस्कृतीत मोठी व्यक्ती लहानाच्या पाया पडत नाही, पण क्रिकेट संस्कृतीत सचिन दिग्गज आहे. याआधी जॉन्टी मुंबई संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये होता.२०१७ ला तो बाहेर पडला. आता पंजाबचा क्षेत्ररक्षण कोच आहे. जॉन्टीने सचिनशी हस्तांदोलन करण्याऐवजी त्याच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला पण स्मितभाषी सचिनने त्याला तसे करू दिले नाही. 

टॅग्स :मुंबई इंडियन्ससचिन तेंडुलकर
Open in App