Join us

Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटमधील 'डॉन'चा विक्रम मोडला

Joe Root Record With 38th Hundred : टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक सेंच्युरीचा रेकॉर्ड, संगकाराची बरोबरी अन् बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 20:15 IST

Open in App

Joe Root Record With 38th Hundred :  मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात इंग्लंडचा बॅटर जो रुट याने विक्रमी शतक झळकावले आहे. एका संघाविरुद्ध सर्वाधिक १२ सेंच्युरीसह टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकवण्यासोबतच त्याने क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन' अर्थात महान क्रिकेटपटू ब्रॅडमन यांचाही विक्रम मोडीत काढला आहे. इथं एक नजर टाकुयात मँचेस्टरच्या मैदानात कसोटी कारकिर्दीतील ३८ वे शतक साजरे करताना जो रुटनं कोणत्या खास विक्रमांना गवसणी घातलीये त्यासंदर्भातील सविस्तर माहिती....

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणारा चौथा फलंदाज ठरला रुट 

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. २०० कसोटी सामन्यात सचिनच्या भात्यातून ५१ शतके आली आहेत. ३८ व्या कसोटी शतकासह जो रुटनं श्रीलंकेच्या संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. त्यानेही आपल्या कारकिर्दीत ३८ शतके झळकावली आहेत. कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता फक्त सचिन तेंडुलकर (५१) जॅक कॅलिस (४५) आणि रिकी पाँटिंग (४१) पुढे आहेत. 

Most Run Scorers In Test: जो रुटनं साधला मोठा डाव; कॅलिस-द्रविडला टाकलं मागे, सचिन टॉपला

टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक सेंच्युरीचा रेकॉर्ड 

कसोटी क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रुट तिसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाविरुद्ध त्याने १२ शतके झळकावली आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियन दिग्गज सर डॉन ब्रॅडमन अव्वलस्थानी आहेत. त्यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटीत १९ शतके झळकवण्याचा पराक्रम केला आहे. लिटल मास्टर गावसकरांनी वेस्ट इंडिज विरुद्ध १३ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. 

जो रुटनं मोडला डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मँचेस्ट कसोटीतील शतकासह जो रुट याने टीम इंडियाविरुद्ध घरच्या मैदानात ९ वे शतक झळकावले. या कामगिरीसह त्याने क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन' ब्रॅडमन यांचा मोठा विक्रम मोडीत काढला. याआधी घरच्या मैदानात एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकवण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमन यांच्या नावे होता. घरच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध त्यांनी ८ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. या दिग्गजाला मागे टाकत रुटनं नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडजो रूट