Join us  

टीम इंडियाच्या नाकीनऊ आणणाऱ्या जो रूटचा ICCकडून गौरव; जसप्रीत बुमराहच्या वर्ल्ड रेकॉर्डची घेतली नाही दखल!

इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं या मालिकेत सलग तीन शतकं झळकावली. त्यानं लॉर्ड्सवर नाबाद १८० धावा करताना एकट्यानं खिंड लढवली होती. या मालिकेत त्याच्या नावावर सर्वाधिक ५०७ धावा आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 3:15 PM

Open in App

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियानं २-१ अशी आघाडी घेत वर्चस्व गाजवले. टीम इंडियाकडून प्रत्येक खेळाडूनं योगदान दिले, तर इंग्लंडकडून कर्णधार जो रूट ( Joe Root) एकटा खिंड लढवताना दिसला. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) त्याची दखल घेतली आणि ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार त्याला दिला. इंग्लंडजा कर्णधार जो रूट हा ऑगस्ट महिन्यातील  ICC Player of the Month ठरला. महिलांमध्ये आर्यलंडच्या ऐमीर रिचर्डसन हीनं हा मान पटकावला. ( England captain Joe Root and Ireland star Eimear Richardson have been voted winners of the ICC Player of the Month for August)

विराट कोहलीची कर्णधारपदावरून गच्छंती?; BCCIनं सांगितलं टीम इंडियाचा कर्णधार कोण...

जो रूटसह या पुरस्कारासाठी भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह व पाकिस्तानचा गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी यांनाही नामांकन देण्यात आले होते. बुमराहनं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत १०० विकेट्स पूर्ण केल्या. भारताकडून सर्वात जलद २४ डावांमध्ये शंभर बळी टीपण्याचा विक्रम नावावर करताना त्यानं कपिल देव यांनी ४१ वर्षांपूर्वी नोंदवलेला विक्रम मोडला.  पण, रूटनं या मालिकेत सलग तीन शतकं झळकावली. त्यानं लॉर्ड्सवर नाबाद १८० धावा करताना एकट्यानं खिंड लढवली होती. या मालिकेत त्याच्या नावावर सर्वाधिक ५०७ धावा आहेत. याच कामगिरीच्या जोरावर त्यानं आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले.   महिलांमध्ये रिचर्डसनला संघसहकारी गॅबी लेवीस व थायलंडची नटाया बूचथॅम यांचे आव्हान होते.  रिचर्डसननं ४.१९च्या सरासरीनं या महिन्यात ७ विकेट्स घेतल्या. शिवाय फलंदाजीतही तिनं ५३ चेंडूंत ४९ धावांची खेळी केली.   

आयसीसी क्रमवारीत जो रूट ९०३ गुणांसह अव्वल क्रमांकावर कायम आहे. त्यानंतर केन विलियम्सन ( ९०१), स्टीव्ह स्मिथ ( ८९१) व मार्नस लाबुशेन ( ८७८) यांचा क्रमांक येतो. ओव्हल कसोटीतील शतकानंतर रोहितनं आयसीसी क्रमवारीत ४० गुणांची भर घातली आहे. तो पाचव्या स्थानावर कायम असला तरी त्याचे रेटिंग पॉईंट्स हे ८१३ इतके झाले आहेत. रोहितनं कारकिर्दीत प्रथमच ८००+ रेटिंग पॉईंट्सची कमाई केली आहे. विराटनंही १७ रेटिंग पॉईंट्स जमा करताना ७८३ गुणांसह सहावे स्थान कायम राखले आहे.  

टॅग्स :आयसीसीजो रूटजसप्रित बुमराह
Open in App