Job Alert : वीरेंद्र सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेत नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय फलंदाजानं मागवलेत अर्ज 

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 02:06 PM2021-03-26T14:06:20+5:302021-03-26T14:07:13+5:30

whatsapp join usJoin us
Job Alert : Following job positions are vacant at Sehwag International School, Virendra Sehwag share details | Job Alert : वीरेंद्र सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेत नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय फलंदाजानं मागवलेत अर्ज 

Job Alert : वीरेंद्र सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेत नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय फलंदाजानं मागवलेत अर्ज 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. चालू घडामोडी, क्रिकेट सामने आणि अनेक सामाजिक विषयांवर तो बिनधास्त भाष्य करतो. समाजकार्यातही तो आघाडीवर असतो पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या मुलांना तो त्याच्या वीरेंद्र सेहवाग अकादमीत प्रशिक्षक देतोय आणि त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही त्यानेच उचलला आहे. शुक्रवारी सेहवागच्या एका ट्विटनं अनेकांचा फायदा होणार आहे. गुडगाव येथे असलेल्या सेहवाग इंटरनॅशनल स्कूलमध्ये जॉब उपलब्ध आहेत आणि वीरून त्यासाठी अर्ज मागवले आहेत. युवकांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची तुमच्यात क्षमता आहे, तर अर्ज करा, असे आवाहन वीरुनं केलं आहे.  jobs@sisj.in या ई मेल आयडीवर त्यानं अर्ज करण्यास सांगितले आहे. १३८ चेंडूंत ३५० धावा कुटणाऱ्या फलंदाजाला इंग्लंडनं मैदानावर उतरवलं, टीम इंडियाचं वाढलं टेंशन


 

Pulwama हल्ल्यात शहीद जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण देतोय वीरेंद्र सेहवाग!
 

पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याला आज दोन वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात भारताचे ४० सीआरपीएफ ( Central Reserve Police Force) जवान शहीद झाले. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानं शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. सेहवागनं त्याच्या हरयाणा येथील झज्जर मधील शाळेत शिकत असलेल्या शहीद जवानांच्या मुलांचे फोटो पोस्ट केले आहेत. वीरूनं १४ फेब्रुवारी २०१९च्या त्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रंद्धांजली वाहिली होती.  श्रेयस अय्यरच्या जागी टीम इंडियात विराट कोहलीचा खास माणूस; नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं

वीरूची क्रिकेट कारकिर्द
१०४ कसोटी - ८५८६ धावा, 100/२३ व 50/ ३२
२५१ वन डे - ८२७३ धावा, 100/ १५ व 50/ ३८
१९ ट्वेंटी-२० - ३९४ धावा , 50/२ 
 

Web Title: Job Alert : Following job positions are vacant at Sehwag International School, Virendra Sehwag share details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.