Join us

२०१७ला क्रिकेट सोडणार होता निशाम; जिद्दीच्या जोरावर न्यूझीलंड संघात मिळविले स्थान

जिमी निशामने ११ चेंडूत २७ धावांची आतषबाजी करीत न्यूझीलंडला  इंग्लंडवर पाच गडी व एक षटक राखून विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 08:00 IST

Open in App

ऑकलंड : टी - २० विश्वचषक स्पर्धेत बुधवारी आश्चर्यकारकारक निकालाची नोंद झाली. दावेदार असलेला इंग्लंड न्यूझीलंडकडून पराभूत होऊन बाहेर पडला.  दोन वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर  झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर सरशी साधत इंग्लंडने पहिल्यांदा वन डे विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. या पराभवाची परतफेड करण्यात अखेर न्यूझीलंडला यश आले.

जिमी निशामने ११ चेंडूत २७ धावांची आतषबाजी करीत न्यूझीलंडला  इंग्लंडवर पाच गडी व एक षटक राखून विजय मिळवून दिला. यामुळे त्याच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली. या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा  निशाम हा २०१७ साली क्रिकेटला रामराम ठोकणार होता. मात्र, त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर केवळ संघात स्थानच मिळवले नाही तर मोक्याच्या क्षणी महत्वपूर्ण खेळी करीत संघाला जेतेपदाच्या नजीक घेऊन गेला आहे.

२०१९ चे ‘ते’ ट्विट व्हायरल

वनडे विश्वचषकात न्यूझीलंड पराभूत होताच जिमी निशामने केलेले ‘ते’ ट्विट टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत इंग्लंडचा पराभव करताच व्हायरल झाले. त्यावेळी निशामने लिहिले होते, ‘मुलांनो क्रिकेटकडे वळू नका, बॅंकिंग किंवा दुसरे क्षेत्र निवडा. वयाच्या ६० व्यावर्षी लठ्ठ होऊन निरोप घेण्यात आनंद आहे.’ यावर कालच्या विजयानंतर एका चाहत्याने लिहिले, ‘मुलांनो निशामचे मुळीच मनावर घेऊ नका.’!

टॅग्स :न्यूझीलंड
Open in App