Join us

OMG : न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूचं बोट मोडलं; शेअर केला खतरनाक फोटो!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाच्या फलंदाजांना जखमी करण्याची एकही संधी ऑसी गोलंदाजांनी सोडली नाही.

By स्वदेश घाणेकर | Updated: January 23, 2021 16:04 IST

Open in App

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाच्या फलंदाजांना जखमी करण्याची एकही संधी ऑसी गोलंदाजांनी सोडली नाही. चेतेश्वर पुजारा तर ऑसी गोलंदाजांचे वार शरिरावर झेलून खेळपट्टीवर नांगर रोवून उभा होता. क्रिकेटच्या मैदानावर जखमी होण्याचे प्रकार काही नवीन नाही. पण, न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूनं दुखापतीचा शेअर केलेला फोटा पाहून सर्वच थक्क झाले आहेत. न्यूझीलंडचा खेळाडू जिमी नीशॅम ( Jimmy Neesham) यानं काही दिवसांपूर्वी दुखापतग्रस्त झाला आणि त्यात त्याचं बोट तुटलं. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्यानं फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

न्यूझीलंडच्या ३० वर्षीय अष्टपैलू खेळाडूच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या स्थानिक ट्वेंटी-20 स्पर्धेत त्याला ही दुखापत झाली. वेलिंग्टन विरुद्ध कँटेर्बरी यांच्यातल्या लढतीतील हा प्रसंग आहे. नीशॅमने लवकरच मैदानावर कमबॅक करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.  नीशॅमनं न्यूझीलंडसाठी १२ कसोटी. ६३ वन डे आणि २४ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत.  

टॅग्स :न्यूझीलंडटी-20 क्रिकेट