Join us

जिम्मी अँडरसनचे कसोटीत ६०० बळी; जगातील पहिला वेगवान गोलंदाज

फॉलोऑननंतर पराभवाच्या छायेत असलेल्या पाकिस्तानला पावसाच्या व्यत्ययामुळे पाचव्या दिवशी मंगळवारी चहापानापर्यंत खेळ शक्य न झाल्यामुळे इंग्लंडविरुद्ध तिसरा व अंतिम कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 03:04 IST

Open in App

साऊथम्पटन : इंग्लंडचा जिम्मी अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. अँडरसनने पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात अझहर अलीला बाद करीत हा पराक्रम केला. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने पहिल्या स्लिपमध्ये त्याचा झेल टिपल्यानंतर सर्व खेळाडू अँडरसनभोवती गोळा झाले. त्यानंतर अँडरसनने उजव्या हातात चेंडू पकडत मैदानाच्या चहूबाजूला नमस्कार केला. कोरोना व्हायरस महामारीमुळे मैदानात एकही प्रेक्षक नव्हता.इंग्लंडने मालिका जिंकलीफॉलोऑननंतर पराभवाच्या छायेत असलेल्या पाकिस्तानला पावसाच्या व्यत्ययामुळे पाचव्या दिवशी मंगळवारी चहापानापर्यंत खेळ शक्य न झाल्यामुळे इंग्लंडविरुद्ध तिसरा व अंतिम कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आले.