Join us  

T20 World Cup 2021: भारताला कसं हरवाल?; Javed Miandad यांनी दिला पाकिस्तानला सल्ला

Javed Miandad on India Pakistan T20 World Cup : टी २० विश्वचषकाची तारीख आता जवळ येत असून India Vs Pakistan या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 4:02 PM

Open in App
ठळक मुद्देटी २० विश्वचषकाची तारीख आता जवळ येत असून India Vs Pakistan या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

Javed Miandad on India Pakistan T20 World Cup : टी -20 विश्वचषकाची तारीख आता जवळ आली आहे आणि या स्पर्धेचा सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. विश्वचषक सामन्यात भारताला हरवणे हे पाकिस्तानचे नेहमीच स्वप्न राहिले आहे. पण त्याचे हे स्वप्न गेल्या तीन दशकांपासून पूर्ण झाले नाही. आता पाकिस्तानचे माजी फलंदाज जावेद मियांदाद (Javed Miandad) यांनी पाकिस्तान हे स्वप्न कसं पूर्ण करू शकतो यासंदर्भात सल्ला दिला आहे.

1992 मध्ये भारत पाकिस्तानचे संघ पहिल्यांदा विश्वचषकात आमने-सामने आले होते. त्यानंतर 2007 मध्ये टी-20 विश्वचषकाची सुरूवात झाली. त्यानंतर हे दोन्ही संघ आमने-सामने येत आहेत. परंतु कोणत्याही फॉर्मेटमध्ये पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही. जे खेळाडू कायम उत्तम खेळ खेळतात, असं नाही की प्रत्येक सामन्यात तेच उत्तम कामगिरी करतील, असं मियांदाद पाकिस्तानातील जिओ न्यूजशी बोलताना म्हणाले. 

"या सामन्यांमध्ये पाकिस्तानला भारताचा पराभव करायचा असेल तर सातत्य कायम ठेवणं आवश्यक आहे," असं ते म्हणाले. तसंच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष रमिझ राजा यांनाही त्यांनी सामना जिंकण्यावर लक्ष केंद्रीत असलं पाहिजे असा सल्ला दिला.

टॅग्स :भारतपाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१जावेद मियादाद
Open in App