वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सोमवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहने आपल्या चार षटकांस्मध्ये ५ विकेट घेतल्या. बुमराहच्या या कामगिरीचं मुंबई इंडियन्सच्या फॅन्सनंही कौतुक केलं. तसंच सामना पाहण्यासाठी आलेली बुमराहची पत्नी संजना गणेशन हीनंदेखील आनंद व्यक्त केला.
मुंबई इंडियन्सची गोलंदाजी संपल्यानंतर संजना गणेशननं ट्वीट केलं. “माय हसबंड इज फायर,” असं ट्वीच तिनं केलं. संजनानं आपल्या ट्वीटमध्ये फायर इमोजीदेखील शेअर केलं आहे. पुष्पा या चित्रपटातील फ्लावर नहीं फायर है हा डायलॉग खुप चर्चेत आला होता. अशातच हे रिअॅक्शनही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
संजना गणेशन स्टेडियममध्ये उपस्थित राहून हा सामना पाहत होती. तिनं प्रत्येक विकेटनंतर स्टँडिंग ओवेशनही दिलं. मुंबई इंडियन्सनंदेखील तिचा आनंद व्यक्त करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. इतकंच नाही, तर मुंबई इंडियन्स संघाचे मालक आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्र्लोका मेहतादेखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. बुमराहनं घेतलेल्या विकेट्सनंतर दोघांनीही आनंद व्यक्त केला. दरम्यान, बुमराहच्या गोलंदाजीचं वसिम जाफर, रवि शास्त्री यांच्यासह अनेक खेळाडूंनी आणि चाहत्यांनी कौतुक केलं.