Join us

Jasprit Bumrah: भारतीय संघातून बाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहची पत्नीसोबत डिनर पार्टी 

 jasprit bumrah wife: जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंकेविरूद्धच्या वन डे मालिकेतून बाहेर झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 13:17 IST

Open in App

नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ मायदेशात श्रीलंकेविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे. मात्र, या मालिकेच्या तोंडावरच यजमान संघाला जसप्रीत बुमराहच्या रूपात मोठा झटका बसला. कारण दुखापतीमुळे बुमराह श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. 6 दिवसांपूर्वी बीसीसीआयने एक मोठी घोषणा केली होती, ज्याअंतर्गत जसप्रीत बुमराहचा श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला होता. पण अचानक तो या मालिकेतून बाहेर पडला. 

बुमराहने डिनर पार्टीला लावली हजेरीदुखापतीमुळे संघाबाहेर असलेला बुमराह आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवत आहे. अलीकडेच त्याने पत्नीसोबत डिनर पार्टीला हजेरी लावली ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. वन डे मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत बोलताना बुमराहबद्दल म्हटले होते की, बुमराहला पाठीचा त्रास होता आणि त्यामुळे त्याला या मालिकेतून वगळण्यात आले आहे. 

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

भारत विरूद्ध श्रीलंका वन डे मालिका 

  1. 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
  2. 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
  3. 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाजसप्रित बुमराहऑफ द फिल्डरोहित शर्मा
Open in App