Jasprit Bumrah: भारतीय संघातून बाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहची पत्नीसोबत डिनर पार्टी 

 jasprit bumrah wife: जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंकेविरूद्धच्या वन डे मालिकेतून बाहेर झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 13:17 IST2023-01-11T13:16:57+5:302023-01-11T13:17:51+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Jasprit Bumrah, who is out of the Indian team, was seen at a dinner party with his wife, watch the video   | Jasprit Bumrah: भारतीय संघातून बाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहची पत्नीसोबत डिनर पार्टी 

Jasprit Bumrah: भारतीय संघातून बाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहची पत्नीसोबत डिनर पार्टी 

नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ मायदेशात श्रीलंकेविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे. मात्र, या मालिकेच्या तोंडावरच यजमान संघाला जसप्रीत बुमराहच्या रूपात मोठा झटका बसला. कारण दुखापतीमुळे बुमराह श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. 6 दिवसांपूर्वी बीसीसीआयने एक मोठी घोषणा केली होती, ज्याअंतर्गत जसप्रीत बुमराहचा श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला होता. पण अचानक तो या मालिकेतून बाहेर पडला. 

बुमराहने डिनर पार्टीला लावली हजेरी
दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला बुमराह आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवत आहे. अलीकडेच त्याने पत्नीसोबत डिनर पार्टीला हजेरी लावली ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. वन डे मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत बोलताना बुमराहबद्दल म्हटले होते की, बुमराहला पाठीचा त्रास होता आणि त्यामुळे त्याला या मालिकेतून वगळण्यात आले आहे. 

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

भारत विरूद्ध श्रीलंका वन डे मालिका 

  1. 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
  2. 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
  3. 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 
 

Web Title: Jasprit Bumrah, who is out of the Indian team, was seen at a dinner party with his wife, watch the video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.