भारत-इंग्लंड ( India vs England) यांच्यातल्या चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) BCCIकडे वैयक्तिक कारणास्तव सुट्टी मागितली. त्यानंतर जसप्रीतनं ही सुट्टी लग्नासाठी मागितल्याचे वृत्त समोर आले आणि त्याची जोडीदार कोण असेल, याबाबत अनेक तर्क लावले गेले. अखेर त्या सर्व चर्चांना सोमवारी पूर्णविराम लागला. भारताचा जलदगती गोलंदाज स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला. डोक्यावर पगडी, सुंदर शेरवानी घातलेला जसप्रीत आणि सुंदर पेहेरावा केलेली संजना यांची जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पण, दुसरीकडे इंटरनेटवर जसप्रीत बुमराहची जात व धर्म ( Jasprit Bumrah Religion ) शोधला जात होता. Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला शुभेच्छा देताना मयांक अग्रवालनं केली चूक अन् व्हायरल झाला संजय बांगरचा फोटो
जसप्रीत बुमराह शिख आहे का?, असा ट्रेंड गुगलवर सुरू होता. तो मूळचा कोण? शीख की आणखी कोण? अशा अनेक प्रश्नांसह बऱ्याच जणांनी त्याच्या मूळ गावाबद्दल सर्च केल्याचे गुगल सांगतेय.