Join us

Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : IPL मध्ये झाली पहिली भेट, मैत्रीचे प्रेमात रुपांतर!; अशी पडली टीम इंडियाच्या गोलंदाजाची विकेट

Jasprit Bumrah Sanjana Ganesan Wedding :भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) सोमवारी ( 15 March in Goa) बोहल्यावर चढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 16:45 IST

Open in App

Jasprit Bumrah Sanjana Ganesan Wedding : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) सोमवारी ( 15 March in Goa) बोहल्यावर चढला. गोव्यात मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीनं जसप्रीतनं स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्याशी लग्न केलं. दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा  परमेश्वरन ( anupama parameswaran) हिच्यासोबत जसप्रीत लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरूवातीला सुरू होत्या, परंतु अभिनेत्रीच्या आईनं या सर्व अफवा असल्याचे सांगितले. त्यानंतर संजनाचे नाव समोर आले. 

संजना गणेशन ही मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल आदी अनेक स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. 

स्टार स्पोर्ट्स वाहिनीसाठी स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून काम करणारी संजना आणि जसप्रीत यांची पहिली भेट इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) दरम्यान झाली. संजना ही कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघाची स्पोर्ट्स अँकर आहे. आयपीएल दरम्यान झालेल्या भेटीत जसप्रीत व संजना चांगले मित्र झाले आणि हळुहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. जानेवारी २०२०मध्ये दोघांनीही 'Naman' या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती आणि त्यावेळचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.   

 

पाहा व्हिडीओ..

टॅग्स :जसप्रित बुमराहसंजना गणेशनआयपीएलकोलकाता नाईट रायडर्स