भारतीय संघाच्या गोलंदाजीचा 'कणा' असलेला जसप्रीत बुमराह इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेतील एकही सामना खेळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. भारतीय संघानं इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेआधी संघात काही बदल केले आहेत. बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी जो नवा संघ जाहीर केलाय त्यात जसप्रीत बुमराहच्या नावाचा समावेश नाही. दुखापतीनंतर तो कमबॅक कधी करणार? हा प्रश्न पडला असताना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धे आधीच्या वनडेत तो खेळणार नसल्याची गोष्ट टीम इंडियाच्या ताफ्यात टेन्शन असल्याचे चित्र निर्माण करणारी आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी बुमराह इंग्लंड विरुद्ध किमान एक वनडे खेळेल अशी अपेक्षा होती, पण..
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं होते. याआधीही पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आयसीसी स्पर्धेला मुकला होता. आता पुन्हा एकदा त्याच्यावर ही वेळ येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बुमराह सध्या बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वैद्यकीय टीमच्या निरीक्षणाखाली आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात तो खेळणार नाही, हे स्पष्ट होते. पण किमान अखेरचा सामना खेळून तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी तयार आहे, ते दाखवून देईल, अशी अपेक्षा होती. पण नव्या संघात त्याचा सामावेश नाही. बुमराहचे नाव वगळण्यासंदर्भात बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
टीम इंडियानं दिली प्लॅन 'बी' ची हिंट
इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात आधी जाहीर केलेल्या संघाच्या तुलनेत प्रामुख्याने दोन बदल दिसून येतात. यात वरुण चक्रवर्तीसह हर्षित राणा याचा भारतीय संघात समावेश करण्यात आल्याचे दिसून येते. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात झालेला बदल हा आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे. जर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जसप्रीत बुमराह फिट नसेल तर टीम इंडियाचा प्लॅन 'बी' काय असेल याची हिंटच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील संघ बदलातून मिळते. बुमराहच्या रिप्लेसमेंटच्या रुपात भारतीय संघात युवा हर्षित राणाला संधी मिळू शकते. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेतील संघातील त्याच्या समावेशासह बीसीसीआयने एक हिंटच दिली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आणि इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी जाहीर केलेला आधीचा संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी नवा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेट किपर), रिषभ पंत (विकेट किपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर , अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
Web Title: Jasprit Bumrah Ruled Out Of England ODI Series Team India Gets Big Hint With Squads Changes Ahead Of Champions Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.