Join us

"मी म्हणालो, तुझी आई..."; जसप्रीत बुमराहने सांगितला ऑस्ट्रेलियातील कॉन्स्टास वादाचा किस्सा

Jasprit Bumrah Sam Konstas argument, BGT IND vs AUS: "मी नेहमी चिडत नाही, पण कधीतरी मलाही राग येतो," असेही बुमराह म्हणाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 12:00 IST

Open in App

Jasprit Bumrah Sam Konstas argument, BGT IND vs AUS: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात खेळण्यात आलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत अतिशय वाईट कामगिरी केली. भारताला ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियात ३-१ अशी मात दिली. भारताचे अनेक बडे खेळाडू ऑस्ट्रेलियन पिचवर पूर्णपणे अपयशी ठरले. केवळ जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियात आपल्या कामगिरीच्या जोरावर छाप उमटवली. त्याने दमदार कामगिरी करत ५ सामन्यात तब्बल ३१ विकेट्स घेतल्या. बुमराहचा ऑस्ट्रेलियन युवा सॅम सलामीवीर कॉन्स्टास बरोबर झालेला वाद चांगलाच चर्चेत राहिला. या दोघांमध्ये त्यावेळी रागारागात काय संभाषण झालं त्याबद्दल जसप्रीत बुमराहने सांगितले.

बुमराह सॅम कॉन्स्टासला काय म्हणाला?

"आमच्या संभाषणाबद्दल तुम्हा लोकांना काहीतरी वेगळं वाटतंय का ते माहिती नाही. पण मी तर त्याला विचारत होते की सगळं ठिक आहे ना? तुझी आई ठिक आहे ना, घरचे बाकी मंडळी ठिक आहेत ना? तो म्हणाला 'हो ठिक आहेत' मग मी म्हणालो 'अच्छा छान, आता मी पुढचा चेंडू टाकतो' तुम्ही लोकांनी वेगळाच काहीतरी अर्थ काढलात. मला असं वाटतं की तेव्हा शब्दांचा गोंधळ झाल्याने थोडासा गैरसमज झाला," असं संभाषण झाल्याचं बुमराह मजेत म्हणाला. एका कार्यक्रमात बुमराह माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक नवजोत सिंग सिद्धू यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्याने असं धमाल उत्तर दिलं.

त्यावेळी काय घडलं होतं - वाचा सविस्तर

मलाही राग येतो!

त्यानंतर बुमराह थोडासा गंभीर संभाषणाकडे वळला. "जेव्हा तुल्यबळ संघ आपल्या विरोधात असतो आणि सामना जेव्हा रंगात आलेला असतो त्यावेळी अशाप्रकारच्या गोष्टी घडतात. ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी असे प्रकार क्रिकेटच्या मैदानावर घडले आहेत. आम्ही त्यावेळी थोडा वेळ वाया घालवायचा प्रयत्न करत होतो, त्यांचे फलंदाजही त्याच प्रकारचा प्रयत्न करत होते. आम्ही त्यांच्या फलंदाजांवर शक्य तेवढा दबाव आणण्याच्या प्रयत्नात होतो. पण दबाव आणण्याचे हे सर्वोत्तम उदाहण नाही. मी कायमच कुणावर तरी चिडलेला असतो असं नाही, पण काही वेळा मलाही राग येतो," असे बुमराहने स्पष्टपणे सांगितले.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासोशल व्हायरलव्हायरल व्हिडिओ