Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ T20I : बुमराह-बिश्नोईसह पांड्याचा जलवा! न्यूझीलंडकडून फिलिप्स अन् चॅपमनने जोर लावला, पण...

पॉवर प्लेमध्ये न्यूझीलंडने गमावल्या तीन विकेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 20:47 IST

Open in App

जसप्रीत बुमराहचा भेदक मारा, कमबॅक सामन्यात  रवी बिश्नोईनं दाखवलेली फिरकीतील जादू आणि हार्दिक पांड्यासहहर्षित राणाच्या सर्वोत्तम स्पेलच्या जोरावर भारतीय संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडला १५३ धावांत रोखले आहे. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमन यांनी जोर लावला. मिचेल सँटनरनंही पुन्हा संघासाठी फलंदाजीत धमक दाखवली. पण या तिघांशिवाय अन्य कुणालाही मैदानात तग धरता आला नाही. परिणाम 'करो वा मरो'च्या लढतीत न्यूझीलंडच्या संघाने टीम इंडियासमोर १५४ धावांचे माफक लक्ष्य ठेवले आहे. या धावांचा यशस्वी पाठलाग करत भारतीय संघाला विजयी हॅटट्रिकसह मालिका खिशात घालण्याची संधी आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 पॉवर प्लेमध्ये हर्षित, हार्दिकसह बुमराहनं दाखवली पॉवर

नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. हर्षित राणानं पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर डेवॉन कॉन्वेला अवघ्या एका धावेवर तंबूचा रस्ता दाखवला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या रचिन रवींद्रही अवघ्या ४ धावांवर हार्दिक पांड्याचा शिकार झाला. पहिल्या दोन षटकात न्यूझीलंडनं दोन विकेट्स गमावल्या. पॉवर प्लेमध्ये अखेरच्या षटकात जसप्रीत बुमराहनं आपली पॉवर दाखवली अन् न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ३४ अशी केली. 

IND vs NZ 3rd T2OI : जसप्रीत बुमराहचं जबरदस्त कमबॅक! Tim Seifert चा अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम'! (VIDEO)

ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमनने जोर लावला, पण...

 ग्लेन फिलिप्सनं ४० चेंडूत केलेल्या ४८ धावा आणि  मार्क चॅपमन याने २३ चेंडूत ३२ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण बिश्नोईनं या दोघांनी आपल्या जाळ्यात अडकवले. ११ वर्षांनी कमबॅकची संधी मिळालेल्या फिरकीपटूनं आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आपली दावेदारी भक्कम करणारी गोलंदाजी केली. अखेरच्या टप्प्यात पुन्हा एकदा न्यूझईलंडचा कर्णधार मिचेल सँटनर १७ चेंडूत २७ धावांची उपयुक्त खेळी केली.  या तिघांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १५३ धावा केल्या. जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ३ तर हार्दिक पांड्या, रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. हर्षित राणानेही आपल्या खात्यात एक विकेट जमा केली.

English
हिंदी सारांश
Web Title : India restricts New Zealand to 153 in crucial T20I match.

Web Summary : बुमराह, Bishnoi, and Pandya shine as India restricts New Zealand to a modest 153 in the must-win T20I. Phillips and Chapman resisted, but India now aims for a series-clinching win with a successful chase.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडजसप्रित बुमराहहार्दिक पांड्याहर्षित राणा