"बुमराह हे एक असं हत्यार आहे जे..."; प्रतिस्पर्धी कर्णधाराने भारतीय गोलंदाजावर केला कौतुकाचा वर्षाव

"एकेकाळी मलिंगा जी किमया करून दाखवत असे तेच आता बुमराह करतो," असेही तो म्हणाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 04:18 PM2024-04-12T16:18:20+5:302024-04-12T16:19:02+5:30

whatsapp join usJoin us
Jasprit Bumrah is like Lasith Malinga a weapon You know that can bring on and take the wickets and also be defensive says Faf Du Plessis IPL 2024 MI vs RCB | "बुमराह हे एक असं हत्यार आहे जे..."; प्रतिस्पर्धी कर्णधाराने भारतीय गोलंदाजावर केला कौतुकाचा वर्षाव

"बुमराह हे एक असं हत्यार आहे जे..."; प्रतिस्पर्धी कर्णधाराने भारतीय गोलंदाजावर केला कौतुकाचा वर्षाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Faf Du Plessis on Jasprit Bumrah, IPL 2024 MI vs RCB: मुंबई इंडियन्सचे आपल्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवाची धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार डु प्लेसिसच्या ६१ आणि दिनेश कार्तिकच्या नाबाद ५३ धावांच्या जोरावर RCBने ८ बाद १९६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इशान किशनच्या ६९ आणि सूर्यकुमार यादवच्या ५२ धावांच्या बळावर Mumbai Indians ने २७ चेंडू राखून सामना जिंकला. मुंबईच्या विजयात जसप्रीत बुमराहने मोलाचा वाटा उचलला. त्याने ५ बळी घेत कमाल करून दाखवली. त्याच्या कामगिरीचे प्रतिस्पर्धी RCBचा कर्णधार फाफ डु प्लेसिस यानेही कौतुक केले.

काय म्हणाला फाफ डु प्लेसिस?

"जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हा सामन्यातील मोठा फरक होता. बुमराह अतिशय हुशार गोलंदाज आहे. त्याने चतुराईने गोलंदाजी केली. मी बराच काळ खेळपट्टीवर झुंज देत होतो. मी त्याच्यावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्याच्या गोलंदाजीतील वैविध्याने मला फटकेबाजी करू दिली नाही. बाऊन्सर, स्लो बॉल, यॉर्कर सगळेच पर्याय त्याच्या गोलंदाजीत असतात. एकेकाळी मलिंगा जी किमया करून दाखवत असे तेच आता बुमराह करतो. त्यामुळे बुमराह हे कर्णधाराकडचे असे हत्यार आहे जे समोरच्या संघाला ब्रेक लावू शकते," अशा शब्दांत फाफ डु प्लेसिसने बुमराहवर स्तुतिसुमने उधळली.

"आम्हाला माहिती होते की दवामुळे नंतर गोलंदाजी कठीण जाईल. त्यामुळे आमचा प्लॅन किमान २२० धावांचा होता. १९० ही धावसंख्या पुरेशी नसणार याची आम्हाला आधीच कल्पना आली होती. काही ठिकाणी दवामुळे सामन्याचे निकाल बदलतात, त्यासारखी आजची स्थिती होती. आम्ही चेंडू अनेक वेळा बदलला. पण हा खेळ आहे त्यामुळे जे घडते ते स्वीकारायलाच हवे. आम्हाला मोठी धावसंख्या उभारून मुंबईला दबावाखाली ठेवायचे होते. आम्ही चांगली कामगिरी केली. पण काही वेळा आमच्या चुकीच्या वेळी विकेट्स गेल्या. आम्ही आमचा डाव सावरत सावरत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली. सकारात्मक फलंदाजीमुळे आम्ही १९०चा टप्पा गाठू शकलो," असेही त्याने नमूद केले.

Web Title: Jasprit Bumrah is like Lasith Malinga a weapon You know that can bring on and take the wickets and also be defensive says Faf Du Plessis IPL 2024 MI vs RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.