Join us  

बुमरावर बुमरँग; हॉटेलबाहेर केले 'हे' कृत्य, सोशल मीडियावर झाला ट्रोल

हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांनी 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात अश्लील वक्तव्य केले होते. त्यामुळे ते दोघेही टीकेचे धनी ठरले होते. त्यांच्यानंतर आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 7:13 PM

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कृत्यांमुळे क्रिकेटपटूंवर टीका होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांनी 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात अश्लील वक्तव्य केले होते. त्यामुळे ते दोघेही टीकेचे धनी ठरले होते. त्यांच्यानंतर आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे.

सध्या आयपीएलचा ज्वर चढत आहे. सारेच तयारीला लागले आहेत. खेळाडू कसून सराव करत आहेत. बुमरा हा आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघातील प्रमुख गोलंदाज आहे. बुमरा सराव करत असताना त्याचा एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे. आणि त्यामुळेच बुमरावर बुमरँग झाल्याचे म्हटले जात आहे.

हा पाहा खास व्हिडीओ

या व्हडीओमध्ये बुमरा हॉटेलमध्ये आल्यापासूने फुटेज दाखवण्यात आले आहेत. बुमरा हॉटेलबाहेर आपल्या गाडीतून उतरला. तेव्हा तिथे असलेल्या गेटकिपरने त्याला नमस्कार केला. त्यानंतर त्या गेटकिपरने बुमराशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. त्यामुळे त्या गेटकिपरकडे न पाहता बुमरा सरळ पुढे निघून गेल्याचे दिसत आहे. या गोष्टीमुळे बुमरा ट्रोल होत असून आजच्या क्रिकेटपटूंना माणुसकी नसल्याची टीका सध्या होत आहे.

मुंबईत सामने कधी?24 मार्च : मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई 10 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई 13 एप्रिल :  मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई15 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई2 मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, मुंबई5 मे : मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई

मुंबईबाहेरील सामने28 मार्च :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू30 मार्च : किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स, मोहाली6 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद18 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली20 एप्रिल :  राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, जयपूर 26 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई28 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता

टॅग्स :जसप्रित बुमराहमुंबई इंडियन्सआयपीएल 2019