जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!

Jasprit Bumrah Breaks Lasith Malinga Record: जसप्रीत बुमराहने लसिथ मलिंगाचा विक्रम मोडीत काढत मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 20:58 IST2025-04-27T20:57:02+5:302025-04-27T20:58:47+5:30

whatsapp join usJoin us
Jasprit Bumrah creates history for Mumbai Indians, breaks Lasith Malinga record during LSG clash | जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!

जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लखनौविरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला. या सामन्यात बुमराहने फक्त २२ धाव देऊन चार विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह बुमराहने संघाचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रम मोडीत काढला आणि मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. 

जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सकडून खेळताना सर्वाधिक १७१ विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीसह त्याने लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला. मलिंगाने मुंबईसाठी १२२ सामन्यात १७० विकेट्स घेतल्या. या यादीत हरभजन सिंह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर मिचेल मॅकक्लेनाघन चौथ्या, कायरन पोलार्ड पाचव्या, हार्दिक पांड्या सहाव्या, कृणाल पांड्या सातव्या, ट्रेंट बोल्ड आठव्या, राहुल चहर नवव्या आणि मुनाफ पटेल दहाव्या स्थानावर आहे.

मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज:

१) जसप्रीत बुमराह- १७१ विकेट्स
२) लसिथ मलिंगा- १७० विकेट्स
३) हरभजन सिंग- १२७ विकेट्स
४) मिचेल मॅकक्लेनाघन- ७१ विकेट्स
५) कायरन पोलार्ड- ६९ विकेट्स
६) हार्दिक पांड्या- ६५ विकेट्स
७) कृणाल पांड्या- ५१ विकेट्स
८) ट्रेंट बोल्ट- ४८ विकेट्स
९) राहुल चहर- ४१ विकेट्स
१०) मुनाफ पटेल- ४० विकेट्स

बुमराहने ४ एप्रिल २०१३ रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने ४ षटकांत ३२ धावा देत ३ विकेट्स घेतले. त्याने विराट कोहलीला बाद करून आयपीएलमधील पहिली विकेट घेतली. बुमराहने आयपीएलमध्ये दोनदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. कोणत्याही गोलंदाजासाठी हे संयुक्तपणे सर्वाधिक आहे. 

Web Title: Jasprit Bumrah creates history for Mumbai Indians, breaks Lasith Malinga record during LSG clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.