Join us

जसप्रीत बुमराह या अभिनेत्रीला करतोय डेट?

हार्दिक पांड्या आणि एली अवराम यांच्यानंतर आता आणखी एका क्रिकेटरचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 18:34 IST

Open in App

नवी दिल्ली : हार्दिक पांड्या आणि एली अवराम यांच्यानंतर आता आणखी एका क्रिकेटरचं नाव अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. यावेळी जसप्रीत बुमराह एका अभिनेत्रीमुळे चर्चेत आलाय. बुमराहचं नाव तेलगु अभिनेत्री राशि खन्नासोबत जोडलं जात आहे. 

मात्र, दोघांपैकी एकानेही यावर काहीही कमेंट केली नाहीये. पण राशिने मीडिया रिपोर्टला कंटाळून यावर पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. एका कार्यक्रमात राशि म्हणाली की, मला केवळ इतकंच माहिती आहे की तो केवळ एक क्रिकेटर आहेत. त्याव्यतिरिक्त मला त्यांच्याबाबत काही माहीत नाही.

आता बुमराह यावर काय उत्तर देणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. असेही बोलले जात आहे की दोघांना आपलं नातं उघड करायचं नाहीये. त्यामुळे ते यावर काहीही बोलत नाहीयेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्या आणि एली अवराम यांना एकत्र एअरपोर्टवर बघण्यात आलं होतं. त्यावेळी कॅमेरा पाहून एलीने चेहरा लपवला होता. पण तरीही ती पूर्णपणे ती लपू शकली नाही. आणि मीडियात दोघांची चर्चा रंगली.

टॅग्स :क्रिकेटजसप्रित बुमराह