आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन कधी? महेंद्रसिंग धोनीनं दिलं उत्तर

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 07:43 PM2019-11-27T19:43:07+5:302019-11-27T19:43:47+5:30

whatsapp join usJoin us
‘January tak mat poocho,’ MS Dhoni on comeback to cricket | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन कधी? महेंद्रसिंग धोनीनं दिलं उत्तर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन कधी? महेंद्रसिंग धोनीनं दिलं उत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. त्यानं दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश या मालिकेतून विश्रांती घेतली आणि मायदेशात होणाऱ्या विंडीजविरुद्धच्या मालिकेतही त्याचा संघात समावेश नाही. त्यामुळे धोनीच्या मनात नेमकं काय चाललंय, याचा अंदाज कुणालाही बांधता येत नाही. पण, बुधवारी धोनीनंच याचं उत्तर दिलं. 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेतून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे वाटत होते. मात्र, निवड समितीनं जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 आणि वन डे अशा दोन्ही संघांत धोनीचं नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विंडीजविरुद्ध धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय होऊ शकतो, अशा चर्चा होत्या. पण, आता धोनी नक्की कधी मैदानावर दिसेल, याची पुन्हा एकदा उत्सुकता लागली आहे.  

विंडीज मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या तीनही मालिकेत धोनीचा संघात समावेश नसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका कार्यक्रमासाठी धोनी बुधवारी मुंबईत आला होता. त्यावेळी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी परतणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला,'' जानेवारीपर्यंत मला काही विचारू नका.'' धोनीच्या या उत्तरानं पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीचं 'टायमिंग' ठरलं; स्वतः करणार घोषणा
धोनीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्तीचं टायमिंग ठरलेलं आहे आणि माही स्वतः त्याची घोषणा करेल, असे समजते. इंडियन प्रीमिअर लीगनंतर धोनी निवृत्तीबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ''आयपीएलनंतर धोनी त्याच्या भविष्याबाबतचा निर्णय घेईल. तो एक मोठा खेळाडू आहे आणि त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा होतच राहणार. मागील एका महिन्यापासून तो कसून मेहनत घेत आहे आणि तो तंदुरुस्त आहे. आयपीएलपूर्वी धोनी किती स्पर्धात्मक सामने खेळतो, यावरही सर्व अवलंबून आहे,''असे सूत्रांनी सांगितलं. 
 

Web Title: ‘January tak mat poocho,’ MS Dhoni on comeback to cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.