नवा गडी, नवं राज्य! आठवेळच्या चॅम्पियनसमोर जम्मू काश्मीरचा रुबाब; Ranji Trophy उंचावत रचला इतिहास

कर्नाटकच्या संघात टीम इंडियातील लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, करुण नायर आणि मयंक अग्रवालसह प्रसिद्ध कृष्णा यासारखे स्टार होते. पण या संघाच जम्मू काश्मीरच्या पठ्यांसमोर काहीच चालले नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 14:19 IST2026-02-28T14:14:46+5:302026-02-28T14:19:06+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Jammu And Kashmir Clinch Historic 1st Ranji Trophy 2025-26 Title After Ranji Trophy Final Match drawn | नवा गडी, नवं राज्य! आठवेळच्या चॅम्पियनसमोर जम्मू काश्मीरचा रुबाब; Ranji Trophy उंचावत रचला इतिहास

नवा गडी, नवं राज्य! आठवेळच्या चॅम्पियनसमोर जम्मू काश्मीरचा रुबाब; Ranji Trophy उंचावत रचला इतिहास

Jammu And Kashmir Clinch Historic 1st Ranji Trophy 2025-26 Title : हुबळी येथील कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात जम्मू काश्मीरच्या संघाने नवा इतिहास रचला आहे. जम्मू काश्मीर आणि कर्नाटक यांच्यात देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील अंतिम सामना  खेळवण्यात आला. फलंदाजी आणि गोलंदाजीतील दिमाखदार कामगिरीच्या जोरावर पाचव्या आणि अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित राखून जम्मू काश्मीरच्या संघाने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं  ६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा फायनल खेळताना जम्मू काश्मीरच्या संघाने पहिली वहिली रणजी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्नही साकार केले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

आठवेळच्या चॅम्पियनचा लागला नाही निभाव, टीम इंडियाकडून खेळणारे स्टारही ठरले फिके

कर्नाटक विरुद्धच्या अंतिम सामन्यात फलंदाजीसह गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर त्यांनी आठ वेळच्या रणजी चॅम्पियन कर्नाटक संघाला अक्षरश: फिल्डिंग करून दमवलं. कर्नाटकच्या संघात टीम इंडियातील लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, करुण नायर आणि मयंक अग्रवालसह प्रसिद्ध कृष्णा यासारखे स्टार होते. पण या संघाच जम्मू काश्मीरच्या पठ्यांसमोर काहीच चालले नाही. 

जम्मू काश्मीरच्या दुसऱ्या डावात दोन शतकवीर

सलामीवीर कामरान इक्बाल याने ३११ चेंडूत केलेल्या नाबाद १६० धावा आणि साहिल लोटरा च्या २२६ चेंडूतील १०१ धावांच्या खेळीसह जम्मू काश्मीरनं दुसऱ्या डावात ४ विकेट्सच्या मोबदल्यात ३४२ धावा केल्या. पाचव्या दिवशी सामना अनिर्णि राहिला अन् रणजी करंडक स्पर्धेतील नियमानुसार, मजबूत आघाडीच्या जोरावर जम्मू काश्मीरचा संघ यंदाच्या  स्पर्धेतील हंगामाचा विजेता ठरला.  जम्मूच्या संघाने दुसऱ्या डावातही दमदार फलंदाजी करत कर्नाटकच्या संघाला फिल्डिंग करून तंगवल्याचे पाहायला मिळाले.  

Ranji Trophy Final: कामरान इक्बालची कडक सेंच्युरी; CM ओमर अब्दुल्लांनी दिलं स्टँडिंग ओव्हेशन! (VIDEO)

पहिल्या डावातही बॅटिंगमध्ये कमाल, कर्नाटकच्या संघाकडून मयंक अग्रवाल एकटाच खेळला

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना शुभम पुंडीर १२१ (२४७) याच्या शतकी खेळीशिवाय कर्णधार पारस डोगरा ७० (१६६), यामेर हसन ८८ (१५०), अब्दुल समद ६१ (१०४), कन्हैया वाधवान ७० (१०९ ) आणि साहिल लोत्रा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर जम्मू काश्मीरच्या संघाने पहिल्या डावात ५८४ धावा केल्या होत्या. याधावसंख्येचा पाठलाग करताना  मयंक अग्रवालनं २६६ चेंडूत केलेली १६० धावांची खेळी वगळता कर्नाटकच्या ताफ्यातील एकालाही मोठी धावंसख्या करता आली नाही.  परिणामी कर्नाटकचा पहिला डाव २९३ धावांत आटोपला. जम्मू काश्मीरच्या संघाने पहिल्या डावात २९१ धावांची आघाडी मिळवल्यावर यंदाच्या  हंगामात नवा विजेता मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते. पाचव्या दिवशी जम्मू काश्मीरच्या संघाने दुसऱ्या डावात दोघांनी शतके झळकावत दिमाखात यावर शिक्कामोर्तब केला.  

गौलंदाजीत औकिब नबीचा कहर

जम्मू काश्मीरच्या संघाकडून गोलंदाजीत औकिब नबी याने कमालीची गोलंदाजी करताना २३ षटकात ५४ धावा खर्च करत कर्नाटकचा अर्धा संघ तंबूत धाडला. याशिवाय सुनील कुमार, युधवीर चरक यांनी प्रत्येकी २ तर साहिल लोटरा याने एक विकेट घेत संघाला ऐतिहासिक जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

Web Title : जम्मू-कश्मीर ने कर्नाटक को हराया, पहली बार रणजी ट्रॉफी जीती!

Web Summary : जम्मू-कश्मीर ने ऐतिहासिक पहली रणजी ट्रॉफी जीती, फाइनल में आठ बार के चैंपियन कर्नाटक को हराया। केएल राहुल और मयंक अग्रवाल जैसे सितारों से भरी कर्नाटक की टीम को जम्मू-कश्मीर ने शानदार प्रदर्शन से मात दी, जो घरेलू क्रिकेट में एक बड़ी उलटफेर है।

Web Title : Jammu & Kashmir stun Karnataka, win historic first Ranji Trophy!

Web Summary : Jammu & Kashmir achieved a historic first Ranji Trophy title, defeating eight-time champions Karnataka in the final. Stellar all-round performance overshadowed Karnataka's star-studded lineup including KL Rahul and Mayank Agarwal, marking a significant upset in domestic cricket.