Join us

रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन

रणजी स्पर्धेत साधला ३२ व्या शतकाचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 21:50 IST

Open in App

Paras Dogra Becomes 2nd Highest Century In Ranji Trophy History : रणजी करंडक स्पर्धेच्या २०२४-२५ च्या हंगामातील पहिल्याच सामन्यात जम्मू काश्मीरचा कर्णधार पारस डोगरा याने आपल्या दिमाखदार कामगिरीनं सर्वांच लक्षवेधून घेतले. श्रीनगरच्या शेर-ए-कश्मीर स्टेडियमवर जम्मू काश्मीर विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना खेळवण्यात येत आहे. मुंबईच्या संघाला पहिल्या डावात ३८६ धावांवर आटोपल्यावर जम्मू काश्मीरच्या संघाने आपल्या पहिल्या डावाची सुरुवात केली. या धावांचा पाठलाग करताना मुंबई संघाच्या गोलंदाजीसमोर जम्मूच्या आघाडीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

रणजी ट्रॉफीत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर; नाबाद शतकी खेळीसह मुंबईकरांवर भारी पडला पारस

संघ अडचणीत सापडला असताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेला ४० वर्षीय  कर्णधार मुंबईकरांना भिडला. पारस डोगरा याने आपल्या अनुभवाच्या जोरावर संघाचा डाव तर सावरलाच. पण दिवसाअखेर नाबाद शतकी खेळीसह त्याने मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली. वयाच्या ४० व्या वर्षी त्याने केलेली ही खेळी तमिळ आणि त्यानंतर हिंदीत रिमेक झालेल्या 'जर्सी' चित्रपटातील हिरोची आठवण करून देणारी होती. फरक फक्त एवढा कल्पनेतील कथेतील हिरो कमबॅकमध्ये दमदार कामगिरी करताना दाखवण्यात आले होते. इथं रिअल हिरोनं संघाला कमबॅक करून देणारी जबरदस्त खेळी केली.

Ranji Trophy : गोवा संघाकडून अर्जुन तेंडुलकरनं मारलेली सेंच्युरी; या पठ्ठ्यानं पदार्पणात ठोकलं विक्रमी द्विशतक

रणजी स्पर्धेत साधला ३२ व्या शतकाचा डाव

दोन दशकापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या पारस डोगरा याने मुंबई विरुद्धच्या शतकी खेळीसह मोठा डाव साधला. रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. या यादीत वासीम जाफर ४० शतकांसह अव्वलस्थानी असून पारस डोगराच्या खात्यात ३२ शतके जमा झाली आहेत.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज

  • वासीम जाफर - ४० शतकं
  • पारस डोगरा - ३२ शतक
  • अजय शर्मा - ३१ शतकं
  • अमोल मुजुमदार - २८ शतकं
  • ऋषिकेश कानिटकर - २८ शतकं

रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही तो दुसऱ्या स्थानी

मुंबई विरुद्धच्या यंदाच्या हंगामातील सामन्यात शतकी खेळीसह पारस डोगरा याने १० हजार धावांचा पल्ला गाठला आहे. रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फक्त वासीम जाफर त्याच्या पुढे आहे. जाफरनं आपल्या कारकिर्दीत रणजी स्पर्धेत १२०३८ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ranji Trophy: 40-year-old Dogra shines against Mumbai, echoes 'Jersey' film.

Web Summary : Paras Dogra's unbeaten century for Jammu & Kashmir against Mumbai in the Ranji Trophy evokes memories of the film 'Jersey.' His resilient innings helped his team recover, marking his 32nd Ranji century and placing him second in the all-time list of century-makers.
टॅग्स :रणजी करंडकबीसीसीआय