Ranji Trophy 2025-26 Jammu and Kashmir vs Bengal, 2nd Semi Final : एका बाजूला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरु असताना दुसऱ्या बाजूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी क्रिकेटचा थाट पाहायला मिळत आहे. कल्याणी येथील बंगाल क्रिकेट अकादमीच्या मैदानात जम्मू काश्मीर आणि बंगाल यांच्यात रणजी करंडक स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामना रंगला आहे. या सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेतलेल्या बंगालचा संघ तिसऱ्या दिवसाअखेर मागे पडला असून जम्मू काश्मीरच्या संघ पहिली फायनल खेळण्याच्या उंबरठ्यावर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोहम्मद शमीनं मैफील लुटली, पण सामना जम्मू काश्मीरच्या बाजूनं फिरला
तिसऱ्या दिवसाच्या खेळात बंगालच्या संघाकडून मोहम्द शमीनं ९० धावांत ८ विकेट्स घेत बंगालच्या संघाला अल्प आघाडी मिळून देत मैफील लुटली. पण दिवसाअखेर चित्र पालटल्याचे पाहायला मिळाले. कारण जम्मू काश्मीरच्या संघाने दुसऱ्या डावात बंगालच्या संघाला ९९ धावांवर ऑलआउट केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी जम्मू काश्मीर संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात ४३ धावा केल्या होत्या. जम्मू काश्मीरला रणजी स्पर्धेतील पहिली फायनल खेळण्यासाठी आता फक्त ८३ धावांची गरज आहे. हा डाव ते साधणार की, मोहम्मद शमी आणि आकाश दीप यासारख्या स्टार गोलंदाजांच्या जोरावर बंगालचा संघ अशक्यप्राय वाटणारा सामना आपल्या बाजूनं फिरवणार ते पाहण्याजोगे असेल.
Mohammad Shami: मोहम्मद शमी... कमबॅकची हमी! रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये एकाच डावात ८ बळी
आघाडीनंतर बिघाडी! बंगालच्या संघाला नमवत जम्मू काश्मीरला नवा इतिहास रचण्याची संधी
रणजी करंडक स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात बंगालच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात ३२८ धावा केल्या. या धावंसख्येचा पाठलाग करताना बंगालचा पहिला डाव ३०२ धावांवर आटोपला. मोहम्मद शमीनं कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करत संघाला २६ धावांची अप्ल आघाडी मिळून दिली. ही आघाडी भक्कम करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगालच्या संघ दुसऱ्या डावात ९९ धावांवर आटोपला. जम्मू काश्मीरकडून औकिब नबी दार याने १० षटकात ३६ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. सुनील कुमारनं ९. १ षटकात २७ धावा खर्च करत ४ विकेट्सचा डाव साधला. या दोघांशिवाय युधवीर सिंग चरक याने २ विकेट्स घेत बंगालच्या संघाला शंभरीच्या आत आटोपले. फलंदाजीत बंगालच्यासंघाकडून शाहबाज अहमद याने २५ चेंडूत केलेली २४ धावांची खेळी सर्वोच्च ठरली.