James Faukner, Pakistan, PSL 2022 : हॉटेलच्या झुंबरावर बॅट-हेल्मेट फेकून देत सोडली Pakistan Super League ; ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जेम्स फॉकनरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर लावले गंभीर आरोप

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मात्र त्याचे सर्व आरोप फेटाळून लावले असून त्याच्यावर PSL मध्ये आजीवन बंदी घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 08:13 PM2022-02-19T20:13:06+5:302022-02-19T20:31:46+5:30

whatsapp join usJoin us
James Faulkner Withdraws From Pakistan Super League Over Contract Dispute Money matter Pakistan Cricket Board Bans Him From Tournament For Life | James Faukner, Pakistan, PSL 2022 : हॉटेलच्या झुंबरावर बॅट-हेल्मेट फेकून देत सोडली Pakistan Super League ; ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जेम्स फॉकनरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर लावले गंभीर आरोप

James Faukner, Pakistan, PSL 2022 : हॉटेलच्या झुंबरावर बॅट-हेल्मेट फेकून देत सोडली Pakistan Super League ; ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जेम्स फॉकनरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर लावले गंभीर आरोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

James Faulkner, Pakistan, PSL 2022 : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनर याने पाकिस्तान सुपर लीगमधून (Pakistan Super League 2022) तडकाफडकी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सामने खेळण्यासाठी मानधन मिळत नसल्याच्या वादानंतर त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. 'पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मानधनाबाबत केलेल्या कराराचे पालन केले नाही. बोर्ड सतत माझ्याशी खोटं बोलत राहिलं', असा गंभीर आरोप जेम्स फॉकनरने PCB वर केला. जेम्स फॉकनर हा पाकिस्तान सुपर लीगमधील क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा भाग होता. मात्र, तो स्पर्धा सोडून गेल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्याच्यावर PSL मध्ये आजीवन बंदी घातली आहे.

फॉकनर क्वेटा संघाकडून गेल्या तीन सामन्यात खेळला नव्हता. मानधनाच्या मुद्द्यावरून तो बराच काळ नाराज असल्याचे समजलं होतं. याबाबत PCBच्या अधिकाऱ्यांशी तो सतत संपर्कात होता. इएसपीएनक्रिकइन्फो दिलेल्या वृत्तानुसार, १८ फेब्रुवारीला हे प्रकरण खूपच तापलं. त्यावेळी फॉकनरने हॉटेलच्या झुंबरावरच बॅट आणि हेल्मेट फेकून दिलं आणि स्पर्धा सोडून तो तडक विमानतळाकडे रवाना झाला.

जेम्स फॉकनरने पाकिस्तान सुपर लीगच्या यंदाच्या मोसमात सहा सामने खेळले आणि सहा बळी टिपले व ४९ धावा केल्या. जेम्स फॉकनरने शनिवारी (१९ फेब्रुवारी) या प्रकरणी दोन ट्विट केली. यामध्ये त्याने पाकिस्तान सुपर लीग सोडल्याची माहिती दिली. पीसीबी आणि पीएसएलने त्याच्याशी ज्या प्रकारे वागणूक दिली ती लज्जास्पद असल्याचे त्याने लिहिले. तसेच, मध्यातच स्पर्धा सोडून जात असल्याने त्याने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची माफीही मागितली.

'मी पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांची माफी मागतो. पण दुर्दैवाने, PCB कडून माझ्या मानधनाच्या कराराचे पालन न झाल्यामुळे मला पाकिस्तान सुपर लीगच्या शेवटच्या दोन सामन्यांमधून माघार घ्यावी लागली. मी स्पर्धेसाठी पूर्ण वेळ उपस्थित असूनही बोर्ड आणि PSL व्यवस्थापन माझ्याशी सातत्याने खोटं बोलत होतं. पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्यात मला हातभार लावायचा होता. पाकिस्तानात खूप जास्त प्रतिभा आहे. चाहत्यांमध्येही क्रिकेटबद्दल खूप प्रेम आहे. अशा वेळी क्रिकेट स्पर्धा अर्ध्यातच सोडून जाणं खूपच वेदनादायी आहे. पण ज्या पद्धतीची वागणूक मिळाली त्यामुळे मी खूप उदास आणि दु:खी झालो आहे', असं ट्वीट करत त्याने आपल्या भावनांना वाट करून दिली.

Web Title: James Faulkner Withdraws From Pakistan Super League Over Contract Dispute Money matter Pakistan Cricket Board Bans Him From Tournament For Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.