Join us

Video : जेम्स अँडरसनने जेव्हा आर अश्विनच्या फोटोचे तुकडे केले होते; तेव्हा कुठे गेली होती खिलाडूवृत्ती?

India vs England : लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडवर १-० अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 13:19 IST

Open in App

India vs England : लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडवर १-० अशी आघाडी घेतली आहे. हा सामना भारतीय खेळाडूंच्या कामगिरीनं गाजला तेवढाच दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये झालेल्या शाब्दीक बाचाबाचीही चर्चा रंगली. मैदानावर उडालेल्या या खटक्यांचे पडसाद सामन्यानंतरही पाहायला मिळाले. यात जेम्स अँडरसन व जसप्रीत बुमराह यांच्यातील वाद जास्तच चिघळला अन् इंग्लंडच्या चाहत्यांकडून टीम इंडियाच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. पण, आता अँडरसनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यात तो भारताचा फिरकीपटू आर अश्विन याचा फोटो फाडताना दिसत आहे.

Video : नीरज चोप्रा ऑलिम्पिक पदक विजेता आहे, बिग बॉस विजेता नाही; मलिष्कावर खवळले नेटिझन्स!

आयपीएल २०१९ दरम्यानचा हा प्रसंग आहे. तेव्हा अँडरसननं फिरकीपटू अश्विनचा फोटो एका मशीनमध्ये टाकून फाडताना दिसत आहे. अश्विननं आयपीएलमध्ये जोस बटलर याच्यासोबत मंकडिंग केल्यानंतरची ही घटना आहे.  

जेम्स अँडरसनचं चुकीचं वागणं, जसप्रीत बुमराहसोबत असं करायला नको होतं; टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी सांगितलं काय घडलं..

भारत-इंग्लंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळवला गेला. त्यात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं फलंदाजीला आलेल्या अँडरसनवर बाऊन्सरचा मारा केला. बाद झाल्यानंतर अँडरसननं प्रत्युत्तरात बुमराहसाठी अपशब्द वापरले. पण, तो डाव संपल्यानंतर बुमराह इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूची माफी मागण्यासाठी गेला होता, मात्र त्यानं भारतीय गोलंदाजाच्या माफीचा स्वीकार केला नाही, असे आर श्रीधर यांनी सांगितले.

आर अश्विन याच्याशी बोलताना श्रीधर म्हणाले,''तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव संपल्यानंतर खेळाडू ड्रेसिंग रूमच्या दिशेनं जात होते. बुमराह त्यावेळी अँडरसनकडे गेला अन् त्यानं माफी मागण्याचा प्रयत्न केला. जे काही केलं ते जाणीवपूर्वक केलेले नाही, असे तो त्याला सांगत होता. पण, अँडरसननं त्याला धुडकावून लावलं. त्याचं हे वागणं टीम इंडियातील अन्य सदस्यांना आवडले नाही आणि त्यामुळेच सर्व भडकले. त्याची प्रचिती पाचव्या दिवसाच्या खेळात आली.'' 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजेम्स अँडरसनआर अश्विन
Open in App