Join us  

न्यूझीलंडसारखं करू नका, आम्ही केलेल्या उपकाराची जाण ठेवा; शाहिद आफ्रिदीचे इंग्लंडला आवाहन

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं ( NZC) दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान दौरा रद्द केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 4:15 PM

Open in App

१८ वर्षांनंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता आणि पहिला वन डे सामना खेळण्यापूर्वीच त्यांनी माघार घेतली. यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) व आजी-माजी खेळाडूंनी NZCवर टीका केली. न्यूझीलंड गुप्तचर विभागानं दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली आणि NZCनं दौराच रद्द केला. आता न्यूझीलंडचे क्रिकेटपटू मायदेशासाठी रवाना होणार आहेत. न्यूझीलंडच्या या निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आगामी मालिकाही संकटात आल्या आहेत. इंग्लंडचा संघ येत्या काही दिवसांत पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे, परंतु आता तोही दौरा संकटात आले. त्यामुळेच माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानं इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाला ( ECB) आवाहन केलं आहे.

IPL 2021 ला सुरुवात होण्याआधीच विराट कोहलीनं जिंकलं मन, घेतला महत्त्वाचा निर्णय

त्यानं ट्विट केलं की,''हीच संधी आहे की, ECBनं शब्दानं नव्हे, तर कृतीतून PCBचं कौतुक करायला हवं. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या चक्रावून टाकणाऱ्या निर्णयानंतरही पाकिस्तान अगदी सुरक्षित आहे. मागील वर्षी कोरोना काळात PCBनं दिलेल्या पाठिंबा ECBनं विसरू नये.''

न्यूझीलंडच्या निर्णयावर पाकिस्तानी खेळाडू नाराज; पाकिस्तानी क्रिकेटची हत्या केलाचा आरोप!

या मालिकेपूर्वी पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे व पाकिस्तान सुपर लीगचे यशस्वी आयोजन करून दाखवले होते. पण, तरीही न्यूझीलंडनं माघार घेतली. त्यांच्या या निर्णयानं इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शाहिद आफ्रिदी म्हणाला,''सर्व सुरक्षा पुरवूनही फक्त खोट्या माहितीच्या आधारावर तुम्ही हा दौरा रद्द केला. न्यूझीलंड क्रिकेट तुम्हाला या निर्णयाचे परिणाम काय होतील हे माहित्येय?  

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तानइंग्लंडन्यूझीलंड
Open in App