IPL 2021 ला सुरुवात होण्याआधीच विराट कोहलीनं घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या काय आहे तो

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात RCBनं ७ पैकी ५ सामने जिंकून १० गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे आणि आता प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किमान ३ सामने जिंकावे लागतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 03:40 PM2021-09-18T15:40:03+5:302021-09-18T15:41:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Virat Kohli said "The blue colour jersey of RCB will be auctioned after the match against KKR for the vaccination purpose in India" | IPL 2021 ला सुरुवात होण्याआधीच विराट कोहलीनं घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या काय आहे तो

IPL 2021 ला सुरुवात होण्याआधीच विराट कोहलीनं घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या काय आहे तो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी विराट कोहली व मोहम्मद सिराज हे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे ( RCB) प्रमुख खेळाडू लंडनहून दुबईत दाखल झाले आणि क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून ते मैदानावर सरावासाठीही उतरले. २० सप्टेंबरला कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात RCBच्या संघात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल आणि त्याबाबत विराटनं एक मोठी घोषणा केली.

Photo : फ्रान्सचे अध्यक्ष राहिले त्या राजवाड्यात राहणार लिओनेल मेस्सी; भाडं जाणून व्हाल अवाक्

प्रत्येक पर्वात एका सामन्यात RCBचा संघ हिरव्या जर्सीत मैदानावर उतरतो. निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण करण्याचा सामाजिक संदेश RCBया सामन्यातून देतो. पण, आता विराटचा संघ हिरव्या नाही तर निळ्या जर्सीत KKR विरुद्ध मैदानावर उतरलेला दिसेल. या निळ्या जर्सीतून RCBचा संघ कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सचा सन्मान करणार आहे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा संदेशही ते देणार आहेत. 


KKR विरुद्धच्या सामन्यानंतर विराट कोहली ब्लू जर्सीवर स्वाक्षरी करून तिचं लिलाव करणार आहे आणि लिलावातून मिळणाऱ्या पैशांचा गरजूंपर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी उपयोग करणार आहे. ( Blue jerseys resembling the colour of the PPE kits of frontline warriors, worn by our players on the 20th Sept v KKR, will be auctioned on  @FankindOfficial. Proceeds from the auction will be used for free vaccination among lesser privileged communities in India.) 

 
RCB Time Table 
20 सप्टेंबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून
24 सप्टेंबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
26 सप्टेंबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, सायं. 7.30 वाजल्यापासून 
29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून
3 ऑक्टोबर - पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून
6 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून
8 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून

Web Title: IPL 2021 : Virat Kohli said "The blue colour jersey of RCB will be auctioned after the match against KKR for the vaccination purpose in India"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.