Join us  

लॉकडाऊननंतर गोलंदाजांना लय मिळविणे कठीण जाईल- ब्रेट ली

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी २१ मे रोजी वैयक्तिक सराव सुरू केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:09 PM

Open in App

मुंबई : लॉकडाऊन संपल्यानंतर गोलंदाजांना लय मिळविणे कठीण जाणार आहे. कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटसाठी सज्ज होण्यास खेळाडूंना किमान आठ आठवडे लागतील, असे मत आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने बुधवारी व्यक्त केले.

आयसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये परतणाऱ्या गोलंदाजांसाठी तयारी करण्याचा कालावधी ८ ते १२ आठवडे, एकदिवसीय सामन्यांसाठी ६ आठवडे आणि टी-२० साठी ५ आठवडे असा कालावधी ठेवण्याची शिफारस केली आहे. लॉकडाऊननंतर फलंदाज आणि गोलंदाज यापैकी कुणाला लय गवसण्यास अधिक वेळ लागू शकतो, या आशयाचा प्रश्न ब्रेट याला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, ‘तुम्ही वन डे खेळणार असाल किंवा कसोटी क्रिकेट, तुम्हाला पुन्हा सज्ज होण्यास आणि लय गवसण्यास किमान आठ आठवडे लागतीलच. फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांसाठी हे काम अधिक अवघड असेल.’

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी २१ मे रोजी वैयक्तिक सराव सुरू केला आहे. त्याचप्रमाणे भारतात शार्दुल ठाकूर याने शनिवारी सरावस सुरुवात केली.(वृत्तसंस्था)

टॅग्स :आॅस्ट्रेलिया