Join us

ईशांत शर्माच्या घरी पाळणा हलला! गोडस कन्येचं झालं आगमन 

भारतीय संघाला जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा ( Ishant Sharma) याच्या घरी गोंडस कन्या जन्माला आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 20:26 IST

Open in App

भारतीय संघाला जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा ( Ishant Sharma) याच्या घरी गोंडस कन्या जन्माला आली आहे. ईशांत आणि त्याची पत्नी प्रतिमा यांनी सोशल मीडियावरून ही गोड बातमी दिली. ईशांत आणि प्रतिमा यांची लव्ह स्टोरी इंटरेस्टिंग आहे.  एका बास्केटबॉल स्पर्धेच्या समारोप समारंभाला ईशांतला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते, तेव्हा प्रतिमाला पाहताच तो प्रेमात पडला होता. 

ईशांतने प्रतिमाला इम्प्रेस करण्यासाठी खूप मेहनत घेतली. दिल्लीतील वसंत कुंज येथील डीडीए  स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बास्केटबॉल कोर्टवर सुरू झालेली ही प्रेमकहाणी १० जानेवारी २०१६ मध्ये लग्नबंधनात अडकली. ईशांतने १०५ कसोटी ३११ विकेट्स घेतल्या आहेत, वन डे क्रिकेटमध्ये ८० सामन्यांत ११५ विकेट्स घेतल्या होत्या. नोव्हेंबर २०२१मध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला, तर २०१६ व २०१३ पासून तो अनुक्रमे वन डे व ट्वेंटी-२० सामना खेळलेला नाही. 

टॅग्स :इशांत शर्माऑफ द फिल्ड