- सौरभ गांगुली लिहितात...
भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान रविवारपासून पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. ही मालिका चुरशीची होईल, अशी आशा आहे. यापूर्वी उभय संघांदरम्यान भारतात खेळल्या गेलेल्या मालिकेमध्ये मोठ्या धावसंख्येच्या लढती झाल्या होत्या. यजमान संघाने या मालिकेत सरशी साधली होती. खेळपट्ट्या जर फलंदाजीला अनुकूल असतील तर या वेळीही मोठ्या धावसंख्येच्या लढती होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत वर्चस्व गाजविल्यानंतर भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. कुठलाही प्रतिस्पर्धी असो, पण आॅस्ट्रेलिया संघाला मनोधैर्य उंचावलेल्या संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार असल्याचे निश्चित आहे. फिरकीपटूंना यश मिळाले तर मालिकेत वेगळीच
चुरस दिसेल.
आॅस्ट्रेलिया संघासाठी तीन बाबी दिलासा देणाºया आहेत. या वेळी
त्यांना शिखर धवन व दोन फिरकीपटू आश्विन व जडेजा यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार नाही. हे
दोन्ही फिरकीपटू मायदेशातील परिस्थितीत धोकादायक ठरू
शकतात. त्यांचा अनुभव व तळाच्या फळीत फलंदाजी करण्याची त्यांची क्षमता लक्षात घेता भारतीय संघ अधिक मजबूत भासतो. निवड समितीला कधी ना कधी युवा खेळाडूंचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे या फिरकीपटूंना विश्रांती देण्याचा निर्णय योग्यच आहे. बुमराहसह मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आल्यानंतर भुवनेश्वरला संधी मिळणार नाही आणि त्यामुळे पांड्यानंतर फलंदाजीची बाजू थोडी कमकुवत भासते.
त्यामुळे अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि शमी यांना
दडपणाखाली महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. धवन केवळ
चांगला खेळाडू आहे असे नाही तर
तो शानदार फॉर्मातही आहे.
भारतीय संघाला त्याची नक्की उणीव भासेल. त्याचा पर्याय म्हणून
अंजिक्य रहाणेला संधी मिळेल, पण त्यासाठी मनीष पांडे किंवा केदार जाधव यांच्यापैकी एकाला विश्रांती द्यावी लागेल.
आॅस्ट्रेलिया संघात अनेक
मॅचविनर्स आहेत, पण फलंदाजीमध्ये सांघिक कामगिरी होणे महत्त्वाचे
आहे. फॉल्कनरच्या साथीला पॅट
कमिन्स आणि जोश हेजलवूड
हे तळाच्या फळीत महत्त्वाचे
योगदान देऊ शकतात. ग्लेन मॅक्सवेलसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. (गेमप्लॅन)