Join us

शाहिद आफ्रिदीनं पुन्हा उपस्थित केला काश्मीर मुद्दा; भारतीयांनी घेतली शाळा 

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 14:07 IST

Open in App

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. काश्मीर मुद्द्यावरून आफ्रिदीनं नेहमीच भारत सरकारवर टीका केली आहे. त्याच्या या ट्विटनं नव्या वादाला तोंड फोडलं आहे. शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच्या समाजकार्यासाठी आफ्रिदीनं शुक्रवारी पाकव्याप्त काश्मीर भागात भेट दिली. तेथील निसर्ग सौंदर्याचे कौतुक करताना त्यांच्या पाकिस्तानप्रती असलेल्या एकनिष्ठेला त्यानं सलाम ठोकला. पण, त्यानंतर त्यानं एक विधान केलं. तो म्हणाला,''काश्मीरींचे दुःख जाणून घेण्यासाठी मला कोणत्याही धर्माचा आधार घेण्याची गरज नाही.'' त्याच्या या विधानाचा भारतीयांनी चांगलाच समाचार घेतला.    त्याच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.. 

पाकमधील हिंदूंना अन्न वाटप करणारा शाहिद आफ्रिदी बांगलादेशच्या मदतीला धावलापाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी कोरोना व्हायरसच्या संकटात समाजकार्य करत आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे आणि त्यामुळे अनेक कुटुंबांनवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कुटुंबीयांना आफ्रिदी जीवनावश्यक वस्तू पुरवत आहे. दोन दिवसांपूर्वी त्या पाकिस्तानातील हिंदुना मदत करण्यासाठी लक्ष्मी नारायण मंदिरात गेला होता. त्यानं तसे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आता आफ्रिदी बांगलादेशच्या मदतीला धावला  आहे. त्यानं क्रिकेटच्या माध्यमातून ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

बांगलादेशमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सरकारच्या मदतीला अनेक बांगलादेशी खेळाडू पुढे आले. काहींनी आपला निम्मा पगार दान केला, तर काहींनी विविध माध्यमातून निधी गोळा करून हातभार लावला. बांगलादेशचा फलंदाज मुशफिकूर रहीम यानं गेल्या महिन्यात याच समाजकार्यासाठी त्याच्या बॅटचं लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक त्यानं या बॅटीतून झळकावले होते. 2013मध्ये त्यानं श्रीलंकाविरुद्ध हा पराक्रम केला होता. 

रहीमनं आतापर्यंत तीन द्विशतकं झळकावली आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात बांगलादेशला मदत करण्यासाठी त्यानं लिलावात ठेवलेली बॅट 20 हजार डॉलर म्हणजे जवळपास 15 लाख रुपयांत आफ्रिदीनं खरेदी केली. या निधीतून बांगलादेशातील गरीबांना मदत केली जाणार आहे. यापूर्वी इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर यांनेही त्याची वर्ल्ड कप विजेती जर्सीचा लिलाव करून 62 लाख रुपये जमवले होते.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

पाकमधील हिंदूंना अन्न वाटप करणारा शाहिद आफ्रिदी बांगलादेशच्या मदतीला धावला

Video : म्युझिक व्हिडीओसाठी लिओनेल मेस्सीचे पत्नीसोबत लिपलॉप; नेटिझन्सकडून ट्रोल

पतीच्या आठवणीनं सानिया मिर्झा भावुक; म्हणाली, इझान आपल्या बाबांना कधी भेटेल माहीत नाही!

Video : अनुष्कानं टाकला विराटला बाऊंसर; विरुष्काचा क्रिकेट सामना पाहिलात का?

Good News : टीम इंडियाला श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्यास BCCI तयार, पण...

टीम इंडियाचे खेळाडू सरावाला लागणार, पण विराट अन् रोहित यांना घरीच रहावे लागणार!

टॅग्स :शाहिद अफ्रिदीजम्मू-काश्मीर