कौन बनेगा करोडपतीच्या 11व्या सीजमनध्ये खेळावर आधारीत आतापर्यंत अनेक प्रश्न विचारून सहभागी स्पर्धकांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न झालेला पाहयला मिळाले. पण, बुधवारी KBC मध्ये चक्क भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्माच्या पत्नीविषयी स्पर्धकाला 6.4 लाखांसाठीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे सर्वांना जरा आश्चर्याचा धक्काच बसला. त्या स्पर्धकालाही त्याचे उत्तर देता आले नाही आणि त्याला 3.2 लाखांवर समाधान मानावे लागले. इशांतने मोठ्या अभिमानानं त्या प्रश्नाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याच्या चाहत्यांना बुचकळ्यात टाकले.
![]()
KBC मध्ये कोणता प्रश्न विचारला?
दिव्या, आकांक्षा, प्रतिमा आणि प्रशांती सिंग या बहीणी कोणत्या खेळात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतात?
A. कुस्ती
B. बास्केटबॉल
C. हॉकी
D. फुटबॉल
![]()
या सिंग भगिनींमध्ये इशांतच्या पत्नीचाही समावेश आहे. प्रतिमा असे तिचे नाव आहे आणि या बहीणी बास्केटबॉल खेळात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतात. स्पर्धकाला याबाबत माहित नव्हते.
प्रतिमा आणि इशांत यांची पहिली भेट एका बास्केटबॉल सामन्यात झाली. जेथे इशांत हा प्रमुख पाहूणा म्हणून उपस्थित होता. त्यावेळी प्रतिमाची बहीण इशांतची मैत्रीण होती आणि तिनेच तो सोहळा आयोजित केला होता. त्यानंतर इशांत आणि प्रतिमा यांच्या भेटीगाठी वाढल्या. जुलै 2016मध्ये हे दोघ लग्नबंधनात अडकले.
![]()