अयाज मेमन , कन्सल्टिंग एडिटर
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय संघात 'गोल्डन बॉय' शुभमन गिलला स्थान न मिळणे आणि इशान किशनचे पुनरागमन होणे, हे निवडकर्त्यांचे अनपेक्षित निर्णय आहेत. गिलच्या बॅटमधून गेल्या १५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत केवळ २९१ धावा निघाल्या. हे गिलच्या दर्जाला साजेसे नाही; परंतु खराब फॉर्ममुळे तो धावा काढण्यासाठी सतत संघर्ष करत राहिला. दुसरीकडे, इशान किशनने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवला आणि झारखंडच्या जेतेपदाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. इशानने जर अशी कामगिरी केली नसती, तर कदाचित गिल संघात कायम राहिला असता.
रिंकू फिनिशर : इशान किशन हा केवळ यष्टिरक्षकच नाही, तर सलामीवीर फलंदाजही आहे. तो अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो. दरम्यान, आणखी एक यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माचे नावही शर्यतीत होते; पण संजू सॅमसन त्याच्यावर भारी पडला. जिथे फिनिशरचा प्रश्न आहे, तिथे रिंकू सिंग ही उणीव भरून काढू शकतो. एकंदरीत, इशान किशनच्या फॉर्ममधील पुनरागमनाने अनेक समीकरणे बदलली आहेत.
अक्षर भविष्यातील कर्णधार :
म्हणजे, अष्टपैलू अक्षर पटेलला हार्दिक पांड्याच्या जागी उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पांड्या उपकर्णधार राहिला असता तरी फारसा फरक पडला नसता; पण अक्षर पटेलला उपकर्णधार बनवून त्याच्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जाऊ शकते. अक्षरला उपकर्णधार बनवण्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.
सूर्यकुमारकडून अपेक्षा : सूर्यकुमार यादवची विश्वचषक
संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असली तरी, आता बरेच काही त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर अवलंबून आहे. तोदेखील गेल्या काही काळापासून फॉर्मात नाही. सूर्यकुमार केवळ बऱ्याच काळापासून संघाचे नेतृत्व करत असल्यामुळेच आपले स्थान वाचवू शकला आहे. जर संघाला स्पर्धेत लवकर लय पकडायची असेल, तर कर्णधार सूर्याला धावा कराव्या लागतील.
इशान किशनची 'सैयद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५' मधील कामगिरी खालीलप्रमाणे आहेः
सामने १०
धावा ५१७
शतके
अर्धशतके
२
२
सर्वोत्कृष्ट धावसंख्या ११३* (नाबाद)
सूर्यकुमार यादवची मागील १५ डावातील कामगिरी
७०, ४७, ०, ५, १२, १, ३९, १, २४, २०, १२, ५, १२, ५, १२
शुभमन गिलची मागील १५ डावातील कामगिरी
२००, १०, ५, ४७, २९, ४, १२, ३७, ५, १५, ४६, २९, ४,०, २८