कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या भारत-पाकिस्तान टी-२० वर्ल्ड कप सामन्यात भारतीय सलामीवीर ईशान किशनने धवाधार खेळी केली. आपल्या स्फोटक फलंदाजीने त्याने नवा इतिहास रचला. सामन्याच्या पहिल्याच षटकात अभिषेक शर्माची विकेट गेली. तरीही त्याचे दडपन न घेता त्याने आक्रमक पवित्रा घेतला.शाहीन आफ्रिदीला पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. ईशानने केवळ २७ चेंडूत अर्धशतक ठोकत पाकिस्ताननी गोलंदाजीचा धुव्वा उडवला. त्याने ४० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकार खेचत ७७ धावांचा धमाका केला. मात्र, आपल्या या खेळीने त्याने ५ ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
ईशान किशनचे ५ नवे विक्रम -- ईशानने २७ चेंडूत अर्धशतक झळकावत भारत-पाक टी-२० सामन्यांमधील तिसरे वेगवान अर्धशतक नोंदवले. त्याने युवराज सिंगचा (२९ चेंडू) विक्रम मोडीत काढला.- पॉवरप्लेमध्ये ४२ धावा कुटत ईशान किशनने शुभमन गिलचा विक्रम मोडला. गिलने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पॉवरप्लेमध्ये ३५ धावा केल्या होत्या.- ईशान, पाकिस्तानविरुद्ध टी-२० मध्ये दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. अभिषेक शर्मा पहिल्या स्थानावर आहे.- ईशानने गौतम गंभीरचा विक्रमही मोडला. त्याने ७७ धावांच्या खेळीसह भारत-पाक टी-२० इतिहासात चौथी सर्वात मोठी खेळी केली. त्याने भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (७५ धावा, २००७) यांना मागे टाकले.- याशिवाय, ईशान सलामीवीर म्हणून पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा खेळाडूही ठरला. या बाबतीतही त्याने गंभीरचा ७५ धावांचा विक्रम मोडीत काढला.
Web Summary : Ishan Kishan's explosive innings against Pakistan in Colombo rewrote record books. His aggressive batting, including a blistering half-century, helped India dominate, surpassing milestones held by Yuvraj, Gambhir, and Gill. He scored 77 runs with 10 fours and 3 sixes.
Web Summary : कोलंबो में ईशान किशन की तूफानी पारी, पाकिस्तान को धूल चटाई और कई रिकॉर्ड तोड़े। युवराज, गंभीर और गिल के रिकॉर्ड तोड़ते हुए, किशन ने आक्रामक बल्लेबाजी से भारत को जीत दिलाई। उन्होंने 10 चौकों और 3 छक्कों की मदद से 77 रन बनाए।