मुंबई : यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशनसह काही करारबद्ध खेळाडूंना वेस्ट इंडीज दौऱ्याआधी पुढच्या आठवड्यात बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेसवर भर द्यावा लागणार आहे. तेथे हे खेळाडू पूर्ण फिट होण्यासाठी घाम गाळतील. १२ जुलैपासून सुरू होत असलेल्या दौऱ्यात भारत वेस्ट इंडीजमध्ये दोन कसोटी, तीन वन डे आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे.
दोन आंतरराष्ट्रीय मालिकांदरम्यान वेळ शिल्लक असल्यास बोर्डाकडून करारबद्ध खेळाडू आणि राष्ट्रीय संंघात संभाव्य दावेदार खेळाडूंना फिटनेसवर मेहनत घेण्यास एनसीएत पाठविले जाते. भारतात स्थानिक सत्राची सुरुवात २८ जून रोजी दुलिप करंडक स्पर्धेद्वारे होत आहे.
या स्पर्धेचे सर्वच सामने बंगळुरू येथे होणार असून, फायनल १२ ते १६ जुलैदरम्यान बंगळुरू येथे होईल. ईशानने दुलिप ट्रॉफी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दुलिप ट्रॉफीचा पहिला सामना पूर्व वि. मध्य विभाग यांच्यात खेळला जाईल.