Join us  

Ishan Kishan Catch Video, IPL 2022 MI vs CSK:  उडता किशन... उंचावर असलेला चेंडू पकडण्यासाठी इशानने हवेत झेप घेतली अन्...

चेन्नईचा संघ ९७ धावांत ऑल-आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 9:51 PM

Open in App

Ishan Kishan Catch Video, IPL 2022 MI vs CSK: मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. चेन्नईचा संपूर्ण संघ अवघ्या ९७ धावांत माघारी परतला. मुंबईकर गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे CSKला शंभरीही गाठता आली नाही. डॅनियल सॅम्सचे तीन बळी आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ याच्या बळावर मुंबईने चेन्नईला ९७ धावांत माघारी धाडले. CSKचा स्टार फलंदाज शिवम दुबेचा इशान किशनने अप्रतिम झेल टिपला.

शिवम दुबे जेव्हा खेळत होता, त्यावेळी CSKची अवस्था ५ बाद ३९ होती. त्यावेळी आठव्या षटकांत गोलंदाजाने चेंडू टाकला. चेंडू बाऊन्सर असल्याने शिवम दुबेने अप्पर कट खेळायचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू बॅटला लागून मागे गेला. इशान किशनच्या उंचीपेक्षा चेंडू खूप वर होता, पण तरीही इशान किशनने उडी घेत अप्रतिम असा झेल टिपला. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, सिमरजीत सिंग, महिषा तिक्षणा आणि मुकेश चौधरी यांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. केवळ चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाबाद ३६ धावा करत संघाला ९७ धावांपर्यंत पोहोचवले.

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी, ड्वेन ब्राव्हो, महेश तिक्षणा, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, ट्रिस्टन स्टब्स, रमणदीप सिंग, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, रायली मेरेडिथ

टॅग्स :आयपीएल २०२२इशान किशनमुंबई इंडियन्समहेंद्रसिंग धोनी
Open in App