आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक सामन्यात अपयशी ठरलेल्या इशान किशन याने दुसऱ्या सामन्यात मोठा धमाका केला. दमदार खेळीच्या जोरावर त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. पॉवर प्लेमध्ये तुफान फटकेबाजी करताना त्याने हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकत अभिषेक शर्माला तगडी फाइट देण्याचे संकेत दिले आहेत. इथं नजर टाकुयात त्याच्या खास विक्रमावर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
३२ चेंडूत ७६ धावांची धमाकेदार खेळी अन्...
पहिल्या टी-२० सामन्यात इशान किशन फक्त ८ धावांवर बाद झाला होता. मात्र दुसऱ्या टी-२० मध्ये युवा डावखुऱ्या फलंदाजाने अक्षरशः धुमाकूळ घातला. इशानने अवघ्या ३२ चेंडूंत ७६ धावांची तुफानी खेळी केली. २३७ च्या स्ट्राइक रेटनं धावा करताना त्याने रोहित शर्माचा एक मोठा विक्रमही मोडीत काढला.
धावांचा पाऊस आणि षटकारांचा विक्रम! सूर्यकुमारने एकाच खेळीत मोडले विराटचे दोन खास रेकॉर्ड्स
रोहित शर्माचा महारिकॉर्ड मोडला
T20I सामन्यांत पॉवरप्लेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इशान किशन आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याने हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकले. रोहित शर्मानं २०२४ मध्ये पॉवरप्लेमध्ये ५१ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात इशान किशन याने पॉवरप्लेमध्ये ५६ धावांची खेळी केली.
अभिषेक शर्माला देतोय तगडी फाईट
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये युवा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा अव्वलस्थानी आहे. गतवर्षी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मानं पॉवर प्लेमध्ये ५८ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. तो भारताच्या डावाची सुरुवात करतो. पण इशान किशन याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. आगामी काळात त्याला सलामीला संधी मिळाली, किंवा खालच्या क्रमांकावर खेळतानाही बॅटिंगची लवकर संधी आली तर तो अभिषेक शर्मालाही मागे टाकू शकतो.
'पाॅवर प्ले'मध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारे फलंदाज
- ५८ - अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड (२०२५)
- ५६ - इशान किशन विरुद्ध न्यूझीलंड (२०२६)*
- ५३ - यशस्वी जैस्वाल विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२३)
- ५२ - अभिषेक शर्मा विरुद्ध श्रीलंका (२०२५)
- ५१ - रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२४)
- ५० - रोहित शर्मा विरुद्ध न्यूझीलंड (२०२०)
- ५० - के. एल. राहुल विरुद्ध स्कॉटलंड (२०२१)