जम्मू-काश्मीरच्या मदतीसाठी इरफान पठाण धावला

पठाणने आपले स्वत:चे घरही देण्याचा मानस बोलवून दाखवला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 05:01 PM2019-09-04T17:01:27+5:302019-09-04T17:02:04+5:30

whatsapp join usJoin us
Irfan Pathan ran to help Jammu and Kashmir cricket team | जम्मू-काश्मीरच्या मदतीसाठी इरफान पठाण धावला

जम्मू-काश्मीरच्या मदतीसाठी इरफान पठाण धावला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 हटवल्यानंतर तिथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत तिथे काही गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे. पण याच वेळी भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण हा जम्मू-काश्मीरसाठी धावला आहे. पठाणने आपले स्वत:चे घरही देण्याचा मानस बोलवून दाखवला आहे.

जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाबाबत सर्व हालचाली बंद करण्यात आलेल्या आहेत. जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेच्या एका अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, " सुरक्षेच्या कारणास्तव सर्व खेळाडूंना जम्मू-काश्मीर सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे." त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये राहून क्रिकेट खेळता येणार नाही. त्यासाठी इरफानने आता मोठे पाऊल उचलले आहे.

जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट संघाचा इरफान हा मार्गदर्शक आणि प्रशिक्षक आहे. त्यामुळे या संघाच्या तयारीबाबत इरफानने काही पावले उचलली आहेत. जर जम्मू-काश्मीरमध्ये राहून खेळाडूंना प्रशिक्षण घेता येत नसेल तर त्यांना आपल्या घरी बडोद्याला इरफानने बोलवून घेतले आहे.

याबाबत इरफान म्हणाला की, " जम्मू-काश्मीरमध्ये सध्याच्या घडीला क्रिकेटचा सराव करता येणार नाही. पण संघासाठी सराव महत्वाचा असतो. त्यामुळे मी सर्व खेळाडूंना बडोद्याला बोलावून घेतले आहे. जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंचा 6 सप्टेंबरपासून आम्ही कॅम्प घेणार आहोत. या कॅम्पमध्ये सराव करून आम्ही स्थानिक स्पर्धेत सहभागी होणार आहोत."

Web Title: Irfan Pathan ran to help Jammu and Kashmir cricket team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.