Join us

सोशल मीडियावर इरफान पठाणचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?, अवघ्या काही तासांतच झाला व्हायरल

खुद्द युसूफ पठाणने आपल्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 14:43 IST

Open in App

भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो आणि आपल्या महत्त्वाच्या अपडेट तो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्याचबरोबर मजेशीर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजनदेखील करत असतो. पुन्हा एकदा इरफान चर्चेत आला आहे.  यावेळी त्याने भाऊ युसूफ पठाणसह एक मजेशीर व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओवर सध्या खूप चर्चा रंगत आहे. खुद्द युसूफ पठाणने आपल्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सध्या रमजानचा महिना सुरू आहे. रमजान महिन्यात कडक नियमांचे पालन केले जाते. कडक उपवास केले जातात. इरफानने सुद्धा रोजा ठेवला आहे. यावरच एक मजेशीर व्हिडीओ इरफानने बनवला आहे. रोजामध्ये चुकून पाणी प्यायल्यास घरचे लगेच कसे रिएक्ट होतात यावर हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये युसूफ पठाण इरफानच्या पाठी बसलेला दिसतोय. इरफानला तहान लागते आणि सवयीप्रमाणे तो पाण्याची बाटली पिण्यासाठी उचलतो. पाणी प्यायला सुरुवात करताच युसुफ पठाण इरफानला भाई तेरा... रोजा है असं म्हणत रोजाची आठवण करू देतो. हे ऐकताच इरफान मजेशीर रिएक्शन देतो. 

हा व्हिडिओ युसूफने 11 मे रोजी रात्री 8 वाजता  शेअर केला होता. अवघ्या काही तासांतच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.आतापर्यंत 4 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर ३ लाखांहून अधिक लोकांनी यावर कमेंटस आणि लाईक्स देत आपली पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या इरफानचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :इरफान पठाणयुसुफ पठाण