Join us  

इरफान पठाननं करून दिली युवराज सिंगला त्याच्या निवृत्तीची आठवण; ट्विटरवर जुगलबंदी

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यानं दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला एकहाती नमवण्याचा पराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 4:15 PM

Open in App

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यानं दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला एकहाती नमवण्याचा पराक्रम केला. पहिल्या डावातील 176 धावांनंतर स्टोक्सनं दुसऱ्या डावात सलामीला येताना नाबाद 78 धावा चोपल्या. शिवाय त्यानं 3 विकेट्स घेत इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत विंडीजवर 113 धावांनी विजय मिळवून दिला.

या विजयाबरोबरच इंग्लंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली आहे.  स्टोक्सच्या या एकहाती खेळीनंतर भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणनं एक ट्विट केलं आणि त्याला युवराज सिंगनं रिप्लाय दिला. स्टोक्सचं कौतुक करताना इरफान म्हणाला की,''भारतीय संघात बेन स्टोक्ससारखा मॅच विनर खेळाडू असता तर संघ जगात कुठेही विजय मिळवू शकतो.'' 

कंगना राणौतवर टीका करणारे त्यांचा खरा रंग दाखवतायत; भारतीय क्रिकेटपटूची बॅटिंग

भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांच्या Ex गर्लफ्रेंड्स; नावं वाचून बसेल धक्का!

इरफानच्या या ट्विटवर युवीनं प्रश्न विचारला. तो म्हणाला,''तुला असं म्हणायचं आहे का, की टीम इंडियात मॅच विनर ऑलराऊंडर नाही?'' त्याला उत्तर देताना इरफान म्हणाला, तु केव्हा निवृत्ती घेतलीस भावा. 

 स्टोक्सनं ICC च्या कसोटी अष्टपैलू खेळाडूंमध्ये विंडीज कर्णधार जेसन होल्डरला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले. अँड्य्रू फ्लिंटॉफ याच्यानंतर अव्वल स्थानावर विराजमान होणार स्टोक्स हा इंग्लंडचा पहिलाच अष्टपैलू खेळाडू आहे. 2006मध्ये फ्लिंटॉफनं ही कामगिरी केली होती. शिवाय स्टोक्सनं कसोटी फलंदाजांत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. स्टोक्सनं अष्टपैलू खेळाडूंमध्ये होल्डरची 18 महिन्यांची मक्तेदारी मोडली. बेन स्टोक्स 497 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. 2008मध्ये जॅक कॅलिसनं 517 गुणांसह अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर स्टोक्सनं सर्वाधिक गुणांची कमाई केली आहे. भारताचा रवींद्र जडेजा ( 397) आणि आर अश्विन ( 281) अनुक्रमे तिसऱ्या व पाचव्या स्थानी कायम आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020चे स्थळ ठरले अन् आता तारीख, वेळही निश्चित झाली?; जाणून घ्या सर्व माहिती!

जगप्रसिद्ध मल्ल सादिक पंजाबी यांचे पाकिस्तानात निधन 

ग्राऊंडस्टाफच्या मदतीसाठी पुढे आला 'सचिन'; करतोय राशनचं वाटप! 

IPL 2020 पूर्वी टीम इंडिया 'या' देशाविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार? BCCIवर वाढता दबाव

विराट कोहलीचा RCB जिंकू शकतो IPL 2020; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं सांगितलं 'भारी' लॉजिक!

सावत्र भावानं 27 हजारांसाठी 13 वर्षांच्या बहिणीला विकलं, पण पुढे जे घडलं ते 'भन्नाट' होतं!

कोरोना ही अल्लाहनं दिलेली शिक्षा, त्यापासून वाचायचं असेल तर...; खासदाराचं अजब लॉजिक

 

टॅग्स :इरफान पठाणयुवराज सिंगबेन स्टोक्स