खरा माणून संकटात कळतो... कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा एकदा हातावर पोट असलेल्यांना हतबल केले आहे. त्यात इरफान व युसूफ हे पठाण बंधू यांनी परत एकदा मदतीसाठी हात पुढे केला आहे. दक्षिण दिल्ली आणि वडोदरा येथील कोरोनाबाधित कुटुंबीयांना मोफत जेवण देण्याचं काम ते करत आहेत. मागच्या वर्षी या बंधूंनी जवळपास ९० हजार कुटुंबीयांच्या घरी रेशन पूरवण्याचं काम केलं आणि हे सर्व त्यांनी स्वखर्चातून करून दाखवले. क्रिकेटच्या मैदानावरील भावांची ही हिट जोडी मैदानाबाहेर सुपरहिट ठरली आहे. आता तर त्यांनी वडोदरा येथे ज्यांना ऑक्सिजन संच हवा आहे त्यांनाही तो मोफत देत आहेत.. भारतीय खेळाडूंचंही कोरोना लढ्यात मोठं योगदान; सचिन, विराट यांच्यासह अनेकांनी लावला हातभार!
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Irfan & Yusuf Pathan : कोरोना संकटात अन्नदाता बनलेले पठाण बंधू आता ऑक्सिजन संचही देतायेत मोफत
Irfan & Yusuf Pathan : कोरोना संकटात अन्नदाता बनलेले पठाण बंधू आता ऑक्सिजन संचही देतायेत मोफत
Irfan and Yusuf Pathan इरफाननं सोशल मीडियावरून चॅरिटीसाठी गोळा केलेली संपूर्ण रक्कम कोरोना लढ्यासाठी दान करण्याचा निर्णय घेतला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 13:54 IST